esakal | पावसाळी अधिवेशन 2020 Update : पहिल्या दिवसातील महत्त्वपूर्ण बातम्या एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Monsoon Session

अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनच्या कुरापतीचा मुद्दा केंद्रस्थानी असणार याचे संकेत दिले.  

पावसाळी अधिवेशन 2020 Update : पहिल्या दिवसातील महत्त्वपूर्ण बातम्या एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत आजपासून 18 दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. देशातील कोरोनाची भीषण परिस्थिती, अर्थव्यवस्थेतून सावरण्याची रणनिती यासंदर्भात हे अधिवेशन महत्त्वपूर्ण मानले जात आहे. सीमारेषेवर चीनकडून सुरु असलेल्या कुरापतीचा मुद्दा हा देखील अधिवेशनाच्या केंद्रस्थानी असेल. याशिवाय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेच्या उपसभापती नियुक्तीसाठी मतदानही घेण्यात येईल. जेडीयूचे हरिवंश आणि मनोज झा या दोन्ही नेत्यांमध्ये सामना आहे. 

-...अन् खासदार सुप्रिया सुळे बरसल्या मोदी सरकारवर

-देश सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या जवानांसोबत : PM नरेंद्र मोदी​

-पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 17 खासदारांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

-बॉलिवूड ड्रग्जप्रकरणाचे लोकसभेत पडसाद, भाजप खासदाराकडून पाक-चीनवरही आरोप

- चीनच्या मुद्यावरुन काँग्रेस मोदी सरकारला घेरणार;

आम्ही लष्करी जवानांसोबत आहोत. भारत-चीन यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीत परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांनी नक्की कोणत्या विषयावर चर्चा केली याचे उत्तर मोदी सरकारला द्यावे लागेल, असे काँग्रेस खासदार शशि थरुर यांनी म्हटले आहे.

-माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींसह अन्य दिग्गज नेत्यांना श्रद्धांजली

- पहिल्या दिवशी डीएमके आणि सीपीआय (एम) ने लोकसभेत NEET परीक्षेसंदर्भात आत्महत्येकडे लक्ष वेधण्यासाठी स्थगन प्रस्ताव ठेवला आहे. 

- अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनच्या कुरापतीचा मुद्दा केंद्रस्थानी असणार याचे संकेत दिले.