INDIA : फक्त राष्ट्रवादी नाही तर हे ६ पक्ष कॉंग्रेसमधून फुटले अन् आज INDIA चा भाग झाले.. असा आहे इतिहास

INDIA : असे ६ पक्ष आहेत, जे एकेकाळी एनडीएमध्ये म्हणजेच भाजप सोबत होते
India
India mumbai

INDIA : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला पर्यायाने भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी देशातील तब्बल २८ पक्ष एकत्र आले आहेत. यांनी आपल्या आघाडीला INDIA असे नाव दिले आहे. यातच आजपासून मुंबईत आघाडीची बैठक आहे. या काही महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत.

मात्र यात रंजक माहिती अशी की, 28 पक्षांपैकी ६ पक्षांचे प्रमुखं हे कधी काळी काँग्रेसमधूनच बाहेर पडले आहेत त्यांनी स्वतःचा पक्ष काढला आहे. तर याशिवाय असे ६ पक्ष आहेत, जे एकेकाळी एनडीएमध्ये म्हणजेच भाजप सोबत होते.

India
'स्वाभिमानी'च्या राजू शेट्टींचं ठरलं! INDIA आघाडीत सहभागासाठी नाना पटोलेंचा थेट फोन; शेट्टी म्हणाले, आम्ही त्यांच्यात..

Keral Congress आणि Keral Congress (M) : के.एम. जॉर्ज आणि आर.बालकृष्ण पिल्लई या केरळच्या मात्तबर नेत्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून फारकत घेऊन केरळ काँग्रेसची स्थापना झाली होती. मात्र पुढे केरळ काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर केरळ काँग्रेस (एम) ची स्थापना 1979 मध्ये झाली.

TMC: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या 1 जानेवारी 1998 रोजी कॉंग्रेसमधून बाहेर पडल्या होत्या. त्यांनी TMC म्हणजेच तृणमूल काँग्रेसचची स्थापना केली होती.

India
INDIA Mumbai Meeting: INDIA च्या बैठकीत 5 मुद्यांवर होणार चर्चा? विरोधकांची महत्त्वाची बैठक, कोण-कोण राहणार उपस्थित?

NCP: राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना 10 जून 1999 रोजी झाली होती. शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी या पक्षाची स्थापना केली होती. या तिघांनी त्यावेळी सोनिया गांधी यांना विरोध केला होता म्हणून त्यावेळी त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती.

PDP: PDP ची स्थापना 1999 मध्ये माजी केंद्रीय मंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी केली होती. मुफ्ती मोहम्मद सईद यांनी काँग्रेस सोडली आणि त्यांची मुलगी मेहबूबा मुफ्तीसोबत पक्षाची स्थापना केली. काश्मीरमध्ये या पक्षाचा चांगलाच दबदबा आहे.

India
sakal Podcast : केंद्राचा मुंबई गिळंकृत करण्याचा डाव ते नागरिकांवर सरकारची पाळत

RLD - चौधरी अजित सिंह हे एकेकाळी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. पुढे त्यांनी RLD म्हणजेच भारतीय किसान कामगार पक्षाची स्थापना केली

AIFB- महात्मा गांधी यांच्याशी वैचारीक मतभेत झाल्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1939 साली ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. आज हाच पक्ष भाजप विरोधात उभा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com