पश्चिम बंगालच्या 'साबूज साथी'ला यंदा परवानगी; राजपथावरील चित्ररथात केंद्राचं राजकारण?

Mamta_banerjee
Mamta_banerjee

कोलकता- पश्‍चिम बंगाल सरकारच्या ‘साबूज साथी’ या योजनेवर आधारित चित्ररथास नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्यास संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली आहे. गेल्या वर्षीच हा चित्ररथ सादर करण्यास राज्याने परवानगी मागितली होती, पण त्याला मान्यता मिळाली नव्हती.

‘साबूज साथी’ या योजनेअंतर्गत पश्‍चिम बंगालमधील नववी ते बारावीतील प्रत्येक विद्यार्थ्यास सायकल मोफत देण्यात येते. ‘युनेस्को’नेही या योजनेचे कौतुक केलेली ही योजना तृणमूल काँग्रेस पक्षासाठी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जमेची बाजू ठरणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या योजनेत आतापर्यंत ८५ लाख विद्यार्थ्यांना सायकलचे वितरण झाले आहे. फेब्रुवारीपर्यंत ही संख्या एक कोटीपर्यंत पोचेल, असा विश्‍वासही व्यक्त केला आहे. तृणमूल काँग्रेसची ही महत्त्वाकांक्षी योजना असली तरी यातील भ्रष्टाचार शोधण्याच्या प्रयत्नात भाजप असून या मुद्यावर निवडणूक प्रचार करण्याची त्यांची रणनीती असल्याचे समजते.

मुलीला सॅल्युट करताना वडिलांचा उर अभिमानाने आला भरून; पोलिस दलाने शेअर केला फोटो

गेल्या वर्षी २६ जानेवारीच्या संचलनात ‘साबूज साथी’ आणि ‘जल धराव जल भराव’ ( ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यासाठी तलाव पुनर्भरण योजना) या योजनांवर आधारित चित्ररथ सादर करण्याचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा विचार होता. मात्र प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात राज्य सरकारच्या विकास योजनांच्या प्रचार करणे योग्य नाही, हे कारण देऊन संरक्षण मंत्रालयाने पश्‍चिम बंगालचा हा प्रस्ताव फेटाळला होता. यावर राज्याच्या मुख्य सचिवांनी मंत्रालयाला पत्र लिहून नाराजी व्यक्त करीत निषेध नोंदविला होता.

नवी दिल्लीत २६ जानेवारीला होणाऱ्या संचलनातील चित्ररथात सायकलवरून शाळेत जाणारे आणि पुस्तके वाचण्यात मग्न असलेले विद्यार्थी दाखविण्यात येणार आहे. हा चित्ररथाचे रचनाकार बाप्पादत्य चक्रवर्ती यांनी या चित्ररथाचे स्वरूप स्पष्ट केले. पश्‍चिम बंगालच्या क्षितीजावर पुस्तकांची भव्‍य चळत व पेनाचे निब दाखविणार येणार असून त्याला रवींद्र संगीताची साथ असणार आहे.

मुनव्वर फारुकीबाबत पोलिसांचा मोठा खुलासा; हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप

चित्ररथावरुन वाद जुनाच

चित्ररथाच्या संकल्पनेवरुन पश्‍चिम बंगाल सरकार व केंद्र सरकारमधील वाद हा नवा नाही. ब्रिटिश काळातील जमीन हक्कासाठी शेतकऱ्यांनी केलेले तीभागा आंदोलन, पंचायत राज या संकल्पना आणि राज्यात डाव्यांचे सरकार असताना अण्वस्त्र प्रसाराविरोधातील आंदोलनासंबंधी चित्ररथ प्रजासत्ताकदिनी संचलनात सहभागी करण्यास केंद्राने नकार दिला होता. ममता बॅनर्जी यांच्या सत्ताकाळात २०१२ पासून पश्‍चिम बंगालचे चित्ररथांचे दर्शन संचलनात होऊ लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com