न्यायालयातील १६ कर्मचारी बडतर्फ;पाटणा उच्च न्यायालयाचा निर्णय 

उज्ज्वल कुमार -सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 7 January 2021

पाटणा उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या १६ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. एका खासगी वृत्तवाहिनीने १५ नोव्हेंबर २०१७ रोजी सत्र न्यायालयातील ही कथित लाचखोरीचे प्रसारण केले होते.

पाटणा - लाचखोरीप्रकणी पाटणा उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या १६ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. एका खासगी वृत्तवाहिनीने १५ नोव्हेंबर २०१७ रोजी सत्र न्यायालयातील ही कथित लाचखोरीचे प्रसारण केले होते. न्यायालयातील या ‘कॅश फॉर जस्टिस’मुळे खळबळ उडाली होती.

विशेष न्यायालयात कर्मचारी व इतरांमध्ये लाचेची देवाणघेवाण सुरू होती. त्यावेळी, वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने हे सर्व प्रकरण आपल्या कॅमेरात टिपले होते. हे प्रक्षेपण पाहिल्यानंतर  या कर्मचाऱ्यांना पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधिश राजेंद्र मेनन यांनी निलंबित केले होते. 

सोनिया गांधी आणि मायावती यांना भारतरत्न द्या; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

न्यायलयातील लाचखोरीला आळा बसणार?
सत्र किंवा कनिष्ठ न्यायालयातील लाचखोरीबद्दल नेहमीच बोलले जाते. पाटणा उच्च न्यायालयाच्या या मोठ्या कारवाईमुळे उशीरा का होईना दोषींना शिक्षा मिळाली आहे. त्यामुळे, न्यायालयासारख्या पवित्र ठिकाणी होणाऱ्या लाचखोरीला आळा बसण्याची शक्यता आहे.

'तीन युवराज कुठं हनीमूनला जातात, काय करतात माहिती नाही'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patna High Court fires 16 Sessions Court employees over bribery