'पेट्रोल-डिझेलवरील करांमधून पंतप्रधान मोदींनी २६ लाख कोटी कमवले'

पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहे. पण...
Narendra Modi And Pawan Khera
Narendra Modi And Pawan Kheraesakal

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पेट्रोल-डिझेलवरील केंद्रीय अबकरी करांमधून २६ लाख कोटी रुपये कमवतात, असा आरोप काँग्रेस नेते पवन खेरा (Pawan Khera) यांनी मोदींवर केला आहे. आज बुधवारी (ता.२७) देशातील मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. यात मोदींनी बिगर भाजप शासित राज्यांना पेट्रोल-डिझेलवरील दरांवरुन टीका केली आहे. व्हॅट जास्त असल्याने महाराष्ट्र व पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर जास्त असल्याचे ते म्हणाले. याचा समाचार खेरा यांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) पेट्रोल-डिझेलवरील (Petrol Diesel Prices) केंद्रीय अबकरी करांमधून २६ लाख कोटी रुपये कमवले. याबाबत ते माहिती देतील का, असा सवाल त्यांनी मोदींना केला. (Pawan Khera Criticize PM Modi On Petrol And Diesel Price Hikes)

Narendra Modi And Pawan Khera
शेतकऱ्यांना दिलासा, खतावरील सबसिडीबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय

तुम्ही राज्यांच्या वाटेचा वस्तू व सेवा कर दिलेला नाही. असे असताना तुम्ही राज्यांना म्हणतायत की व्हॅट कमी करण्यास सांगत आहात. तुम्ही केंद्रीय अबकरी कर कमी करा आणि तेव्हा इतरांना व्हॅट कमी करण्यास सांगा, असे आवाहन पवन खेरा यांनी नरेंद्र मोदी यांना केले आहे.

Narendra Modi And Pawan Khera
महाराष्ट्र,बंगालमध्ये सर्वाधिक व्हॅट; इंधन दरवाढीवरून बैठकीतच मोदींचा टोला

इंधनावरील किंमती गेल्या नोव्हेंबरमध्ये केंद्राने अबकरी कर घटवले आहे. राज्यांनी कर कमी करावेत, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. मी कोणावरही टीका करत नाही. मात्र मी महाराष्ट्र (Maharashtra), पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड, तामिळनाडू या राज्यांना व्हॅट कमी करुन लोकांना त्याचा फायदा द्यावा, असा सल्ला मोदींनी दिला आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com