

Petrol Diesel Shortage India
esakal
Petrol Diesel Supply India : देशातील पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी पुरवठ्याची स्थिती उत्तम आहे. भारताकडे पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन कपातीची गरज नसल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून आज सांगण्यात आले. काही जुने व्हिडिओ किंवा परदेशातील छायाचित्रे वापरून देशात इंधन टंचाई असल्याचा अपप्रचार केला जात आहे. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर केंद्र सरकार कठोर कायदेशीर कारवाई करेल. नागरिकांनी समाज माध्यमांवरील अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि केवळ अधिकृत सरकारी माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन सरकारने केले आहे.