Petrol-Diesel Price: अनेक शहरांत पेट्रोलचे दर 120 रुपयांच्या पार; जाणून घ्या आजचे दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

petrol diesel hike

Petrol-Diesel Price: अनेक शहरांत पेट्रोलचे दर 120 रुपयांच्या पार; जाणून घ्या आजचे दर

भारतीय तेल कंपन्यांनी 6 एप्रिलपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या दरांत कोणतीही दरवाढ केलेली नाही. पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले असून आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (Todays Petrol-Diesel Price)

पेट्रोल-डिझेलच्या किमतीसोबत सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. सातत्यानं वाढणाऱ्या इंधन दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र झळ लागली आहे.

हेही वाचा: दर्दपोरामध्ये शाळेचे स्वप्न पूर्ण!

6 एप्रिल महिन्यात सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय. 6 एप्रिल ला पेट्रोल-डिझेल दोन्ही इंधनाच्या दरांमध्ये 80 पैसे प्रति लिटरची वाढ करण्यात आली होती. तेव्हापासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहे.

दरम्यान, 22 मार्चपासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये 10 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे. तरीही देशातील अनेक शहरांत पेट्रोल डिझेलनी शंभरी ओलांडली आहे.

हेही वाचा: Inflation : मार्चमध्ये वाढली महागाई; सरकारने जाहीर केली आकडेवारी

मुंबईत पेट्रोलचे दर सध्या 120.51 रुपये प्रति लिटरवर तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत.

गेल्या कित्येक दिवसापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला असला तरी किंमती स्थिर आहे. देशातील काही महत्त्वाच्या शहराचे पेट्रोलचे दर खालील प्रमाणे -

दिल्ली -105.41

मुंबई -120.51

चेन्नई- 110.85

हैद्राबाद - 119.49

कोलकाता - 115.12

बंगळुरू - 111.09

पुणे -119.97

Web Title: Petrol Diesel Price Remains Same Know Todays Rate Of Your City

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..