अपंग महिलेला दिल्लीतील प्रसिद्ध रेस्तराँनं नाकारला प्रवेश!

प्रवेश नाकारताना रेस्तराँच्या व्यवस्थापकानं त्यांना जे कारण दिलं ते धक्कादायक होतं.
shrushti Panday
shrushti Panday

गुरुग्राम : व्हिलचेअरवर असणाऱ्या एका अपंग महिलेला दिल्लीतील गुरुग्राम येथील एका प्रसिद्ध 'रास्ता' रेस्तराँनं परवानगी नाकारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जर तिला व्हिलचेअरसह रेस्तराँमध्ये परवानगी दिली तर ग्राहकांचं लक्ष विचलीत होईल, असं कारण सांगत तिला रविवारी इथं प्रवेश नाकारण्यात आला. (Physically disabled woman denied entry in Gurugram restaurant)

दिल्लीची रहिवासी असलेली सृष्टी पांडे या तरुणीनं एएनआयशी बोलताना सांगितलं की, रविवारी मी गुरुग्राममधील सायबर हबमध्ये गेले होते. या ठिकाणी रास्ता नावाच्या रेस्तराँमध्ये आम्ही जेवण्यासाठी गेलो पण इथल्या व्यवस्थापकानं आम्हाला प्रवेश नाकारला. प्रथम त्यांनी ग्राहकांची गैरसोय होईल असं सांगून आम्हाला टेबल देण्यास नकार दिला. तत्पुर्वी जेव्हा माझ्या मित्राच्या भावानं त्यांना रेस्तरॉंमधील अपंगांच्या आरक्षणाबाबत विचारले, तेव्हा त्यांनी या विनंतीकडे दुर्लक्ष केले. रेस्तराँ बाहेरची आसनव्यवस्था अतिशय वाईट होती. थंडी पडत होती आणि मी जास्त वेळ थंडीत बाहेर बसू शकत नाही कारण मला अर्धांगवायू झालेला आहे. त्यामुळं ते माझ्यासाठी खूपच असुरक्षित आहे"

shrushti Panday
बीड : सह्याद्री देवराईला भीषण आग; दोन एकरवरील झाडं जळून खाक

लोकांमध्ये अपंगांसाठी संवेदनशीलता आणि काळजी नसल्याचं सांगणाऱ्या सृष्टीला अशी वागणूक मिळण्याची ही पहिलीच घटना नाही. त्यामुळं या घटनेमुळं दुखी झालेल्या श्रृष्टीनं म्हटलं की "आम्हाला या देशातील इतर नागरिकांप्रमाणेच मूलभूत मान्यता आणि आमचे हक्क हवे आहेत" दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेली श्रृष्टी सांगते की तिचा हा 'दैनंदिन' संघर्ष आहे.

shrushti Panday
उद्योगपती राहुल बजाज यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

"माझ्यासारख्या लोकांना मिळणाऱ्या अशा वागणुकीमुळं आम्ही आमच्या घरातून कोठेही बाहेर जाऊ शकत नाही. कारण जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा मी कोणत्या ठिकाणी जाऊ शकते किंवा माझ्यासाठी प्रवेशयोग्य काय आहे याची तपशीलवार माहिती घ्यावी लागते. कारण तिथं सर्वत्रच ठिकाणी पायाभूत सुविधा असतीलच असे नाही. काही ठिकाणीतर आम्हाला आपमानास्पद वागणुकीला सामोर जावं लागतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com