‘मोदी नव्हे, तर भाजपचे ‘हे’ दोन दिग्गज PM पदासाठी मुस्लिमांची पहिली पसंत’

Maulana Tauqeer Raza comment on PM Election
Maulana Tauqeer Raza comment on PM ElectionMaulana Tauqeer Raza comment on PM Election

बरेली : आठ वर्षांपासून नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान आहे. त्यांचाच चेहरा पुढे करून भाजपने लोकसभेची निवडणूक जिंकली. आता २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसंदर्भात इत्तेहादे मिल्लत काउंसिल प्रमुख आणि जगप्रसिद्ध दर्गाह अला हजरत कुटुंबाचे मौलाना तौकीर रझा (Maulana Tauqeer Raza) यांनी भाष्य केले आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत मौलाना तौकीर म्हणाले की, मायावतींना वाटते की त्यांनी पंतप्रधान व्हावे, समाजवादी पक्षाच्या प्रमुखांना वाटते की त्यांनी पंतप्रधान व्हावे. जर हे सर्व स्वतःसाठी काम करीत राहिले तर कोणीही पंतप्रधान होणार नाही. भारतीय जनता पक्षाशी लढायचे असेल तर सर्वांना एकत्र लढावे लागेल. काँग्रेसलाही बलिदान द्यावे लागेल, असे मौलाना तौकीर म्हणाले.

Maulana Tauqeer Raza comment on PM Election
Don't Talk To Me; संसदेत स्मृती इराणींवर सोनिया गांधी संतापल्या

स्वच्छ चेहरा आणण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, अन्यथा आगामी काळात भाजपमधील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे देशाचे पुढचे पंतप्रधान व्हायला हवेत, असा निर्धार मुस्लिमांनी केला आहे, असे मौलाना यांनी सांगितले. नमूद भाष्य करून मौलाना तौकीर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

मौलाना तौकीर रझा हे वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. नरेंद्र मोदी (Narendra Modi) इतके मोठे देशभक्त आहेत तर त्यांना आजपर्यंत आरएसएसच्या कार्यालयावर तिरंगा झेंडा का फडकवता आला नाही. देशभक्त असतील तर त्यांनी दोन मित्रांची संपत्ती जप्त करून देशाला समर्पित का केली नाही. त्यांनी आपल्या मित्रांना जे दिले ती देशाचीच संपत्ती आहे, असेही मौलाना तौकीर (Maulana Tauqeer Raza) म्हणाले.

Maulana Tauqeer Raza comment on PM Election
‘राष्ट्रपत्नी’च्या वक्तव्यावर अधीर रंजन चौधरींचे स्पष्टीकरण; मी बंगाली...

...अन्यथा कोणीही भाजपशी स्पर्धा करू शकणार नाही

सर्वांनी मिळून ममता बॅनर्जी यांना पंतप्रधानपदाचा चेहरा बनवल्यास चांगला परिणाम साधता येईल. अन्यथा कोणीही भाजपशी स्पर्धा करू शकणार नाही. देशाची लोकसंख्या सुमारे १४० कोटी आहे. ही खूप मोठी शक्ती आहे. आज आपण उपासमारीच्या उंबरठ्यावर आहोत. आज स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असतानाही आपण पाहतो की, शेतकरी आत्महत्या करायला भाग पाडतात व लोक उपाशी मरतात, असे मौलाना तौकीर म्हणाले.

राष्ट्रध्वजाचाही व्यवसाय

देशातील जनतेने या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. नेत्यांनी देशभक्तीच्या नावाखाली जनतेचे शोषण केले आहे. देशाच्या राष्ट्रध्वजाचाही व्यवसाय केला आहे. यापेक्षा दुर्दैवी काहीही असू शकत नाही, असे मौलाना तौकीर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com