आधी जनता मग प्रधानसेवक; लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात PM मोदी घेणार कोरोनाची लस

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने अलिकडेच या महिन्याच्या सुरवातीलाच दोन लसींना मान्यता दिली आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये कोरोनाची लस दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी म्हटलंय की, 50 वर्षे वयावरील राजकारण्यांना पुढील टप्प्यातील लसीकरणामध्ये लस देण्यात येईल. 

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलिस, पालिका कर्मचाऱ्यांसारखे 50 वर्षे वयावरील फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात येणार आहे. तसेच 50 वर्षे वयाखालील व्यक्ती ज्यांना इतर व्याधी आहेत, त्यांनाही ही लस देण्यात येणार आहे.  24 नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांसमवेत झालेल्या बैठकीमध्ये लसीकरणासाठीचा साधारणत: प्राधान्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली होती.

हेही वाचा - Pfizer vaccination in Israel : लस घेऊनही तब्बल 12,000 कोरोनाबाधित

याआधी करण्यात आलेल्या 50 वर्षे वयावरील गटामध्ये वाढ करण्यात आली असून आता त्यामध्ये 65 वर्षे वयावरील लोकांचा समावेश करण्याचा विचार प्रस्तावित आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, थोडक्यात, यामध्ये ज्येष्ठ नागरिक, आणि वयस्कर लोकांचा समावेश असेल. भारतामध्ये हायपरटेन्शन, डायबेटीज आणि हृदयरोगासारखे आजार पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत लवकर येतात. त्यामुळे 50 वर्षे वयाहून अधिक लोकांना लसीकरणात प्राधान्य देणे योग्य ठरेल, असं मत तज्ञांकडून व्यक्त केलं जातंय.

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने अलिकडेच या महिन्याच्या सुरवातीला सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड लशीला मान्यता दिली आहे. तसेच भारत बायोटेक कंपनीच्या स्वदेशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन लसीलाही मान्यता देण्याता आली आहे. जगभरात सर्वांत मोठे लसीकरण सध्या भारतात केलं जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi and CMs Likely to be Vaccinated Against Covid-19 in Round 2