पंतप्रधान मोदी ८३ दिवासंनंतर प्रथमच दिल्लीबाहेर

वृत्तसंस्था
Friday, 22 May 2020

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच तब्बल ८३ दिवसानंतर दिल्लीबाहेर पडले आहेत.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच तब्बल ८३ दिवसानंतर दिल्लीबाहेर पडले आहेत. पश्चिम बंगालमध्ये अम्फान या चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहणी दौरा करण्यासाठी कोलकाता येथे दाखल झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गेल्या २८३ वर्षातील हे सर्वात भयंकर वादळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अम्फान बाधित भागाची हवाई पाहणी करणार आहेत. तिथे ममता बॅनर्जी यांनी त्यांचे स्वागत केले. आता अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हवाई पाहणी करणार आहेत. शुक्रवारी सकाळपर्यंत पश्चिम बंगालमध्ये अम्फानच्या वादळामुळे ८० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे सुमारे १ लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे.

--------
पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला; पोलिस हुतात्मा
--------
विमानप्रवासासाठी मार्गदर्शक सूची जाहीर; सेतू ऐपविषयी महत्वाची घोषणा
--------
दोन महिन्यानंतर दिल्ली पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर
--------
चार दिवसांचा वर्कवीक करा; कंपन्यांना सल्ला
--------
दरम्यान, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पंतप्रधान दिल्लीबाहेर पडले नव्हते. लॉकडाऊनच्या काही दिवस आधीपासून पंतप्रधान मोदी दिल्लीबाहेर गेले नाहीत. अम्फानच्या वादळामुळे ओडिशामध्येही नुकसान झाले आहे. बंगालच्या तुलनेत तेथे कमी नुकसान झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी ओडिशामध्येही झालेल्या नुकसानीची हवाई पाहणी करणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींना राज्यात येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर काही तासांनंतरच पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगाल दौरा करण्याचा निर्णय घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi Arrives in Kolkata to Assess Damage, Mamata Says Treat it Like National Disaster