पंतप्रधान म्हणाले; माझ्यावर प्रेम असेल तर एवढचं करा...

narendra modi
narendra modi

नवी दिल्ली: माझ्यावर जर प्रेम असेल तर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असे पर्यंत एका कुटुंबाची जबाबदारी घ्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून केले आहे.

मोदींनी ट्विटवर म्हटले आहे की, एका जागी पाच मिनिटे उभे राहून मोदींना सन्मानित करा, अशी मोहीम काही जणांनी सुरू केल्याचे समजतेय. यामागे कोणाचा चांगला हेतूही असू शकतो. जर कोणी मोदींना सन्मानित करू इच्छित आहे आणि माझ्यावर एवढे प्रेम आहे तर करोना व्हायरसचा प्रादुर्भाव असेपर्यंत एका गरीब कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी. माझ्यासाठी यापेक्षा मोठा कोणताही सन्मान नसेल.'

दरम्यान, कोरोना व्हारसचा नायनाट करण्यासाठी मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन केला होता. लॉकडाऊन 14 तारखेला संपना असून, याबाबतचा पुढील निर्णय शनिवारी (ता. 11) घेणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com