
नवी दिल्ली : गावातून मिळणारं ज्ञान अनेकांना प्रेरणा देणारं असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. पंचायत राज दिनानिमित्त त्यांनी देशातील सरपंचांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनामुळे आपल्या समोर अनेक समस्या आल्या. अनेक समस्या अशा होत्या ज्यांची आपण कधी कल्पनाही केली नव्हती. या समस्यांनी आपल्याला खुप काही शिकवलं. यामुळे आपल्याला स्वावलंबी बनण्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश मिळाला, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई ग्राम स्वराज या वेबपोर्टलचं अनावरण करण्यात आलं. “करोनानं आपल्याला स्वावलंबी बनण्यास शिकवलं. स्वावलंबी बनल्याशिवाय कोणत्याही संकटाचा सामना करणं अशक्य आहे. गाव, जिल्हे, राज्य, देश हे या निमित्तानं आपापल्या स्तरावर स्वावलंबी बनले. यापुढे आपल्याला कोणत्याही गोष्टींसाठी बाहेरच्या कोणावरही अवलंबून राहावं लागू नये इतकं स्वावलंबी राहावं लागेल. सशक्त पंचायत हे स्वावलंबनाचं उदाहरण आहे,” असंही मोदी यावेळी म्हणाले.
Coronavirus : देशात दररोज ५५ हजारांपेक्षा जास्त चाचण्या : डॉ. हर्षवर्धन
पीएम मोदी म्हणाले की, कोरोनाने आपल्या सर्वांचे कार्य करण्याची पद्धत बदलली आहे. पूर्वी आम्ही समोरासमोर एक कार्यक्रम करायचो. पण आज हाच कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करावा लागला आहे. आज मी या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या सर्वांचे स्वागत करतो. एकात्मिक पोर्टल म्हणजे पंचायती राज मंत्रालयाचा एक नवीन उपक्रम आहे. जो ग्रामपंचायतींना त्यांची ग्रामपंचायत विकास योजना तयार करण्यास आणि अंमलात आणण्यास मदत करतो. यावेळी पंतप्रधानांनी स्वामित्व नावाची योजनाही सुरू केली आहे. ही योजना पंचायत राज मंत्रालय, राज्य पंचायती राज विभाग, राज्य महसूल विभाग आणि भारतीय सर्वेक्षण यांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील निवासी जमिनीच्या सीमांकनासाठी एकात्मिक मालमत्ता पडताळणी मार्ग प्रदान करते.
दरवर्षीप्रमाणे या वेळीदेखील, सेवा व सार्वजनिक वस्तूंचे वितरण सुधारण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणारे पंचायती राज मंत्रालय, पंचायत यांना पुरस्कृत केले जाईल. यावर्षीही तीन प्रकारचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. नानाजी देशमुख गौरव ग्रामसभा पुरस्कार, बाळ-सुलभ ग्रामपंचायत पुरस्कार व ग्रामपंचायत विकास पुरस्कार राज्य व केंद्रशासित प्रदेशांना देण्यात येईल.
Coronavirus : एटीएममपासून सावधान; तीन जवानांना कोरोनाची लागण
मोदी म्हणाले, 'आज सव्वा लाखांपेक्षा अधिक पंचायतींपर्यंत इंटरनेट पोहोचलं आहे. काही वर्षांपूर्वी ही परिस्थिती वेगळी होती. आजमितीस गावांत कॉमन सर्व्हिस सेंटरची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. तसंच भारतानं देशातच स्वस्त मोबाईल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज गावातील जनतेकडेही मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन उपलब्ध आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.