चीनसोबत जे काही सुरू आहे त्यावरून मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत - ट्रम्प

PM Modi not in good mood over border row with China says Trump
PM Modi not in good mood over border row with China says Trump

वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीन सीमावादाप्रकरणात चांगल्या मूडमध्ये नसल्याचं वक्तव्य केलं आहे. व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प असे म्हणाले आहेत. ट्रम्प यांनी यावेळी आपल्या मध्यस्थीच्या प्रस्तावाचा पुनर्रुच्चार केला.
--------
योगी सरकारचे घुमजाव; कामगार नेण्यासाठी परवानगीची गरज नाही
--------
गुगलचा मोठा निर्णय; भारतातील 'या' टेलिकॉम कंपनीत करणार गुंतवणूक
--------
जर माझ्याकडे मदत मागितली तर मी नक्कीच मध्यस्थी करेन, असं ते एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर करतो. ते एक चांगले व्यक्ती आहेत. भारत आणि चीन या दोन्ही देशांची १.४ अब्ज लोकसंख्या आहे. दोन्ही देशांचं लष्करही ताकदवान आहे. भारत या संपूर्ण प्रकारावरून बिलकुल खुश नाही, तसंच चीनदेखील नाही. जर त्यांनी माझ्याकडे मदत मागितली तर मी नक्कीच मध्यस्थी करेन, असं ट्रम्प यावेळी म्हणाले. 'मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे. चीनसोबत जे काही सुरू आहे त्यावरून ते चांगल्या मूडमध्ये दिसत नाहीत, असंही ते म्हणाले. दरम्याम, असे सांगितले जात असले तर मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कुठलाही संपर्क झालेला नसल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले असल्याचे एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

तत्पूर्वी, ट्रम्प यांनी एक ट्विट करत दोन्ही देशातील वाद कमी करण्यासाठी आपण तयार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, भारतानं ट्रम्प यांचा हा प्रस्ताव नाकारला होता. आम्ही शांततामय मार्गानं चीनसोबत याप्रकरणी चर्चा करत आहोत, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भारत चीन सीमेवर तणाव पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com