PM Modi Birthday: ...त्यादिवशी मोदींनी घर सोडलं आणि घरच्यांचं वागणंच बदललं!

आईच्या सांगण्यावरुन वडिलांची मोदींची कुंडली ज्योतिषाला दाखवली. ते पाहून ज्योतिषी म्हणाला ....
PM Narendra Modi with his Mother
PM Narendra Modi with his MotherSakal

PM Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या घटनेबद्दल जाणून घ्या. मोदी आपल्या भाषणांमध्ये वारंवार आपण घर सोडल्याचा उल्लेख करतात. जेव्हा मोदींनी घर सोडलं, तेव्हा त्यांच्या घरच्यांना, त्यांच्या आईला काय वाटलं असेल? याबद्दल मोदींनीच लिहून ठेवलं आहे.

आपल्या एका लेखात पंतप्रधान मोदींनी याबद्दलची माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी म्हणतात की, जेव्हा मी घर सोडायचं ठरवलं, त्यावेळी माझ्या आईला आधीच माझ्या या निर्णयाची कुणकूण लागली होती. मी सतत माझ्या आईबाबांना सांगायचो की मला बाहेर जायचंय, जग समजून घ्यायचंय. मी त्यांना स्वामी विवेकानंदांबद्दल सांगायचो. मला रामकृष्ण मिशन मठामध्ये जायचंय, असंही सांगायचो. असेच काही दिवस गेले आणि मी एक दिवस माझी घर सोडण्याची इच्छा त्यांना सांगितली आणि त्यांचे आशीर्वाद मागितले.

PM Narendra Modi with his Mother
PM Modi Birthday: मोदींवरही 'उद्धव ठाकरे फीवर'; परदेशातून चित्ते भारतात येताच...

पुढे मोदी म्हणतात की, माझे वडील अतिशय नाराज झाले होते. त्यांना त्रास होत होता. त्यातच ते म्हणाले की तुला करायचं असेल ते कर. मी त्यांना सांगितलं की मी त्यांच्या आशीर्वादाशिवाय घर सोडणार नाही. मात्र माझ्या आईने माझ्या इच्छा ओळखल्या आणि मला आशीर्वाद दिला. तुझं मन जे सांगेल ते कर, असंही तिने मला सांगितलं. तसंच आईने माझ्या वडिलांना माझी कुंडली बघण्याचा सल्ला दिला. त्यावरुन वडिलांनी एका ज्योतिषाला ते दाखवलं. माझी कुंडली पाहून तो ज्योतिषी म्हणाला की, या मुलाचा मार्ग वेगळाच आहे. तो त्याच मार्गाने जाईल, जो याच्यासाठी परमेश्वराने लिहून ठेवला आहे. (Pm Modi)

PM Narendra Modi with his Mother
PM Modi Birthday : 9 वर्षात मोदींनी घेतले 'हे' 9 मोठे निर्णय; जाणून घ्या सर्वसामान्यांवर काय झाला परिणाम

आपण घर सोडल्यानंतर आईची प्रतिक्रिया काय होती, आईने काय केलं, याबद्दलही मोदींनी लिहून ठेवलं आहे. आईबद्दल लिहिताना मोदी म्हणतात, "मी घर सोडताना माझ्या वडिलांनी सगळी नाराजी बाजूला ठेवली आणि मला आशीर्वाद दिला. आईने जाताना मला दही गूळ खायला घातलं आणि साश्रूनयनांनी मला निरोप दिला आणि भविष्यासाठी आशीर्वाद दिले. मला आधी आई तू म्हणायची. पण जेव्हा मी घर सोडून गेलो आणि त्यानंतर परत आलो, तेव्हापासून आईने मला 'तू' म्हणणं बंद केलं. आता ती मला कधीच 'तू' म्हणून संबोधत नाही. ती मला सतत 'तुम्ही' असंच म्हणते."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com