#पीएम_पनौती : 'या' कारणामुळे मोदी होत आहेत ट्रोल!

PM_Modi
PM_Modi

कर्जाच्या खाईत गेलेल्या येस बँकेमुळे नागरिकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. येस बँकेत खाते असणाऱ्या खातेधारकांना बँकेबाहेर रांगेत उभे राहावे लागल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकार प्रमुख या नात्याने नागरिकांनी सगळा संताप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काढण्यास सुरवात केली आहे. 

पीएम पनौती हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड असून कोट्यवधी नेटकऱ्यांनी आपला संताप जाहीर केला आहे. देश का चौकीदार म्हणत देशातील संपत्ती लयास जाण्याला मोदीच कारणीभूत आहेत.

२००८ मध्ये जागतिक मंदी असतानाही तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्या योग्य निर्णय क्षमतेद्वारे भारताला तारले होते. मात्र, हे कसब मोदींकडे नसल्याने त्यांनी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. मोदींचे निर्णय हे सर्वसमावेशक नसल्यामुळेच भारताला वारंवार झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकाचे जगणे असह्य होऊ लागले आहे.

नोटबंदी, कॅशलेस इंडिया यांसारखे निर्णय देशासाठी घातक ठरले आहेत. आपल्या कमाईचे हक्काचे पैसे मिळण्यासाठी काम सोडून नागरिकांना बँकेबाहेर उभे राहावे लागत आहे. दिवाळीदरम्यान पीएमसी बँक आणि होळीला येस बँक खातेदारांना लाईनमध्ये उभे राहण्याची वेळ मोदी सरकारने आणली आहे. कॅशलेस नाही तर बँकलेस इंडियाकडे देशाची वाटचाल सुरू असल्याची टीकाही नेटकरी करत आहेत.   

तसेच केंद्र सरकारने सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण सुरू केले. जातीय दंगली घडविल्या. भारतीय एकात्मतेला बाधा पोहोचविण्याचे सर्व प्रयत्न करून पाहिले आहेत. एकीकडे महागाई, बेरोजगारी हे अगोदरचे प्रश्न तोंड आ वासून उभे असतानाच आता दुसरीकडे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, तर बँकाचे दिवाळे निघाले आहेत. या सर्वांना मोदी सरकार जबाबदार आहे, असे आरोपही नेटकऱ्यांनी केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com