esakal | थेट रामजन्मभूमीतून : पंतप्रधानांच्या हस्ते 'कारसेवे'ला प्रारंभ?
sakal

बोलून बातमी शोधा

pm narendra modi may inaugurate karsevak for ram mandir in ayodhya

रामजन्मभूमी हा मुद्दा भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर असून देखील पंतप्रधान मोदी गेल्या याबाबत फारसे काही बोललेले नाहीत. तसेच चार महिन्यांपूर्वी ते फ़ैजाबाद जवळ आले होते. परंतु, अयोध्येत येण्याचे त्यांनी टाळले होते.

थेट रामजन्मभूमीतून : पंतप्रधानांच्या हस्ते 'कारसेवे'ला प्रारंभ?

sakal_logo
By
मंगेश कोळपकर : सकाळ वृत्तसेवा

अयोध्या : रामजन्मभूमीच्या जागेवरील नियोजित मंदिराच्या 'कार सेवेसाठी' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्याचा प्रयत्न रामजन्मभूमी न्यासातर्फे सुरू झाला आहे. पंतप्रधान कार्यालयाने त्याला 'जय श्रीराम'  म्हटले तर, मंदिर निर्मितीला धुमधडाक्यात प्रारंभ होईल.

आता राम मंदिर होणार 72 एकर जागेवर 

राम मंदिर उभारणीसाठी तीन महिन्यांत केंद्र सरकारने ट्रस्ट स्थापन करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येतील सहा महंतांची नावे ट्रस्टमध्ये सामिल करण्यासाठी रामजन्मभूमी न्यासाने निश्चित केली आहेत. पुढील वर्षी 24 मार्च रोजी गुढीपाडवा आहे तर, 2 एप्रिल रोजी रामनवमी आहे. त्याकाळात देशातील भाविक मोठ्या संख्येने अयोध्येत येतात. त्याचे औचित्य साधून पंतप्रधानांच्या हस्ते मंदीराची पायाभरणी करता येईल का? याची चाचपणी न्यासातर्फे करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी त्याबाबत अनौपचारिक चर्चा झाल्याचे, न्यासातील सूत्रांनी सांगितले.

वक्फ बोर्ड म्हणजे केवळ दुकानदारी : एच. एम. खान 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राज्यपालांच्या भेटीला

रामजन्मभूमी हा मुद्दा भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर असून देखील पंतप्रधान मोदी गेल्या या बाबत फारसे काही बोललेले नाहीत. तसेच चार महिन्यांपूर्वी ते फ़ैजाबाद जवळ आले होते. परंतु, अयोध्येत येण्याचे त्यांनी टाळले होते, त्याचे कारण म्हणजे न्यायालयीन सुनावणी सुरू होती. आता सगळे 'क्लिअर' झाल्यामुळे ते अयोध्येत येऊ शकतात, असे न्यासातील आणि स्थानिक भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकांसाठी पायाभरणीसाठी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 'कार सेवा' करण्यात आली तर मंदिर निर्मितीला आणखी वेग येऊ शकतो, असेही न्यासाला वाटत आहे. त्यामुळेच नियोजित राममंदिराच्या कारसेवेसाठी पंतप्रधानांना, आमंत्रित करण्यासाठी अयोध्येत घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत.