पंतप्रधान मोदींनी केले राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक; काय आहे कारण?

टीम ई-सकाळ
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, राज्यसभेत भाषण केले. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दलाचे कौतुक केले

नवी दिल्ली : महाराष्ट्रात भाजपला सत्तेतून बाजूला ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची धडपड सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, राष्ट्रवादी काँग्रेसचे गोडवे गायले आहेत. विशेष म्हणजे राज्यसभेतील आपल्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केले आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सरकार स्थापनेबद्दल शिवसेनेला विचारा, शरद पवारांचे धक्कादायक वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, राज्यसभेत भाषण केले. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दलाचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, 'आज, मी दोन राजकीय पक्षांचे कौतुक करू इच्छितो. या दोन्ही पक्षांनी संसदीय पक्षांचे अतिशय काटेकोरपणे पालन केले आहे. ते कधीच सभा अध्यक्षांच्या पुढे आले नाहीत. असे करूनही सभागृहात त्यांनी त्यांचे मुद्दे अतिशय व्यवस्थित मांडले. माझ्यासह इतर पक्षांनी त्यांच्याकडून हे शिकण्यासारखं आहे.'

राज्यसभेविषयी बोलताना अनेक बड्या नेत्यांनी या सभागृहात काम केले आहे. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून अनेक महान व्यक्तींचा समावेश आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मुख्य बातम्या
लाईव्ह अपडेट्स 
ताज्या बातम्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi praises ncp and bjd in rajya sabha speech