राष्ट्रपतींनी नेताजींचा नव्हे, तर अभिनेत्याच्या पोर्ट्रेटचं केलं अनावरण? खरं काय वाचा

Subhas_Chandra_Bose
Subhas_Chandra_Bose

पुणे : कोणाकडून चूक झाली की सोशल मीडियात त्याची प्रचंड चर्चा होते. तिथं कुणालाही माफ केलं जात नाही, मग त्याजागी देशाचे राष्ट्रपती का असेनात. नेटकरी मीम्स बनवून खूप ट्रोल करतात, यावेळी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लक्ष्य केलं आहे. 

राष्ट्रपती कोविंद यांनी २३ जानेवारी २०२१ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त एका फोटोफ्रेमचं अनावरण केलं. पण त्यांनी अनावरण केलेल्या फोटोमध्ये नेताजींच्या जागी अभिनेते प्रसेनजित चॅटर्जी यांचा फोटो होता. याआधी प्रसेनजीत यांनी नेताजींची भूमिका साकारली आहे. त्यामुळे नेताजींचा फोटो म्हणून प्रसेनजित यांच्याच फोटोचं अनावरण करण्यात आलं. नेताजींचा खरा फोटो का वापरण्यात आला नाही, यामुळे सध्या नेटकऱ्यांनी राष्ट्रपतींना ट्रोल केलं आहे. 

अभिनेते प्रसेनजित चॅटर्जी हे बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. टेलिव्हिजन ते चित्रपट असा प्रवास केलेले आणि रुपेरी पडदा गाजवणारे अभिनेते अशी त्यांची ओळख आहे. प्रसेनजित यांनी साकारलेली नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारी ठरली. कारण खरेखुरे नेताजी आणि प्रसेनजित यांनी अभिनयातून साकारलेले नेताजी हुबेहूब असल्याने अनेकजण बुचकळ्यात पडले. 


दरम्यान, राष्ट्रपतींना ट्रोल करताना नेटकऱ्यांनी त्यांना सल्ले दिले आहेत. आगामी काळात भगतसिंग यांच्या फोटोचं अनावरण करताना राष्ट्रपतींनी अजय देवगण आणि बॉबी देओल यांचे फोटो निवडावेत. 

तर काहींनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याऐवजी कंगना राणावतच्या मणिकर्णिका चित्रपटातील फोटो वापरावेत. तसेच चंद्रशेखर आझाद यांच्याऐवजी सनी देओलचा फोटो वापरावा, अशा सूचना दिल्या आहेत. 

नेताजींच्या नातवाने मागील वर्षी असाच एक फोटो केला होता ट्विट 
काही नेटकरी मात्र राष्ट्रपतींच्या बाजून उभे राहिले आहेत. राष्ट्रपतींना ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देत त्यांनी गेल्या वर्षी नेताजींचे नातू चंद्रकुमार बोस यांनी केलेल्या ट्विटचे उदाहरण दिले आहे. बोस यांनी नेताजींचे मूळ चित्र सार्वजनिक करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रसिद्ध पेंटर परेश मैती यांचाही संदर्भ देण्यात आला. मूळचे पश्चिम बंगालचे असणारे मैती यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त असून त्यांनीच हे पोट्रेट बनवले आहे.

सोशल मीडियातून आरोप करणं खूप सोपं आहे. नेत्यांसह अनेक नेटकऱ्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. पण नेताजींच्या या फोटोबद्दल समजल्यानंतर अनेकांनी माघार घेतली आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com