राज्यातील शेतकरी आंदोलन ते सीमेवर भारत-चीन संघर्ष; वाचा एका क्लिकवर

latest news maharashtra farmers protest rahul gandhi india china trump america
latest news maharashtra farmers protest rahul gandhi india china trump america

राज्यात आझाद मैदानावर शेतकरी आंदोलन सुरू असून यामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तर काँग्रेसमध्ये नाना पटोलेंच्या नव्या मागणीमुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज झाल्याची चर्चा आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची मन की बात ऐकावी असं म्हटलं आहे. दुसरीकडे सीमेवर भारत चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा झटापट झाली. यामध्ये चीनचे 20 सैनिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. 

भारत-चीन सैनिकांमध्ये पुन्हा झटापट; 20 सैनिक जखमी झाल्याची शक्यता
उत्तर सिक्किमच्या नाकू ला सेक्टरमध्ये ही झटापट झाल्याचे सांगितलं जात आहे. या संघर्षामध्ये दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाला एक दिवस राहिला असताना हा संघर्ष झाल्याने चिंता वाढली आहे. सविस्तर वाचा

नागपूरचा 'निकरवाला' तमिळनाडूचं भविष्य ठरवू शकत नाही; राहुल गांधी बरसले
राहुल गांधी यांनी काल सायंकाळी तमिळनाडूतील एका कार्यक्रमात भाजपासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील निशाणा साधला आहे. सविस्तर वाचा

'Worst President Ever'; ट्रम्प यांच्या घरावरुन फिरताहेत ट्रोल करणारी विमाने
पाचच दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. मात्र, आधीसारखेच त्यांना ऑनालाईन माध्यमातून अजूनही ट्रोल करण्यात येत आहे. कदाचित आता  होणारे ट्रोलिंग हे यापूर्वी केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगहून देखील अधिक असण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा

धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया,‘मी राजकीय भांडवल केले नसते’
राजकीय भांडवल केले जाऊ नये. त्याचा त्यांच्यावर परिणाम होऊ नये याची माध्यमांनी काळजी घेतली पाहिजे, या शद्बांत पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावर बोलल्या आहेत. सविस्तर वाचा

मुकेश अंबानींनी सेकंदात मिळवलेली संपत्ती कमवण्यासाठी गरीबाला लागतील 3 वर्षे
कोरोना महामारीने जगासह देशभरात धुमाकूळ घातला आहे. आता कुठे देशातील परिस्थिती आटोक्यात येताना देसत आहे. असे असले तरी कोरोना विषाणूमुळे भारतात अब्जाधीश आणि कोट्यवधी बेरोजगार, अकुशल मजूर, गरीब पुरुष आणि महिला यांच्यातील उत्पन्नाच्या असमानतेची दरी आणखी रुंदावली आहे. सविस्तर वाचा

नाना पटोलेंच्या नव्या डिमांडमुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज ? जाणून घ्या काय आहे ही कथित मागणी
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले  यांची निवड जवळजवळ निश्चित झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे नेते दिल्लीत वरिष्ठांना देखील भेटले होते. सविस्तर वाचा

जबरदस्त ! कोणताही पुरावा नसताना, अवघ्या एका तासात मुंबई पोलिसांनी सोडवली केस
मुलाला निर्जनस्थळी नेऊन आरोपींनी मुलाच्या बापाकडे चक्क 10 लाखांची खंडणी मागितली. घाबरलेल्या मुलाच्या बापाने पोलिसांची मदत घेतल्यानंतर मालाड पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपींना शोधून काढत अटक केली आहे. सविस्तर वाचा 

मोदीसाहेब जरा शेतकऱ्यांची मन की बात ऐका, खासदार अमोल कोल्हे यांची पंतप्रधांनांना विनंती 
'शेतकरी आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांचा आक्रोश असून त्यांना मन की बात ऐकवण्यापेक्षा शेतकऱ्यांची मन की बात ऐकायला हवी'' असा सल्लाच खासदार अमोल कोल्हे यांनी थेट पंतप्रधानांना दिला. सविस्तर वाचा

'राखीचे कपडे फाडले,वडिलांनी घराबाहेर काढले'
खलनायक म्हणून ज्या अभिनेत्यांचे नाव अद्यापही प्रेक्षकांच्या मनात आहे त्यात कलाकार रणजीत यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. आपल्या अभिनयानं रसिकांच्या ह्रद्यात स्थान मिळवणा-या रणजित यांचा बॉलीवूडमधील प्रवास काही सोपा नव्हता. सविस्तर वाचा

HBD Cheteshwar Pujara: आईनं हप्त्यावर घेतलेल्या बॅटवर केली प्रॅक्टिस, आता टीम इंडियाचा भरवशाचा बॅट्समन
राहुल द्रविडनंतर पुजाराने टीम इंडियाकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळताना 5000 पेक्षा जास्त रन्स केले आहेत. त्याने 81 कसोटीत 18 शतके आणि 28 अर्धशतकांच्या मदतीने 6111 रन्स केले आहेत. सविस्तर वाचा

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com