‘पॉझिटिव्ह’ मातेला मोदींची दाद!

कोरोना संसर्ग झाल्यामुळे गाझियाबादमधील एका मातेला घरातच विलगीकरण करणे भाग पडले. सहा वर्षांच्या पुत्राच्या सहवासाला ती मुकली.
Narendra Modi
Narendra ModiSakal

नवी दिल्ली - कोरोना संसर्ग (Corona Infection) झाल्यामुळे गाझियाबादमधील एका मातेला घरातच विलगीकरण (Separation) करणे भाग पडले. सहा वर्षांच्या पुत्राच्या सहवासाला ती मुकली. एक माता म्हणून या वेदनादायक आव्हानाचा कसा सामना केला याविषयी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र (Letter) लिहिले. त्यावर मोदी यांनी तिच्या धैर्याला दाद दिली. (Positive Women Mother Narendra Modi Letter)

या महिलेचे नाव पूजा वर्मा असे असून ती सेक्टर सहामध्ये राहते. तिला एप्रिलमध्ये कोरोना संसर्ग झाला. पती गगन कौशिक हे सुद्धा बाधित असल्याचे आढळून आले. त्यामुळे तीन बेडरूममध्ये तिघांचे विलगीकरण करण्यात आले. मुलासाठी हा कालावधी फार कठीण ठरला. कोरोनाचा विषाणू, प्रतिबंधात्मक उपाययोजना, विलगीकरण असे कळण्याचे वय नसलेल्या मुलाला आई-वडीलांच्या प्रेमास मुकावे लागले. आपल्याला वेगळ्या खोलीत एकटे का राहावे लागते हे कोडे त्याला पडले. दुसरीकडे पूजा यांच्यातील मातेचे ह्रदयही व्याकूळ झाले.

Narendra Modi
राम मंदिर जमीन घोटाळा : संजय सिंहांचा कोर्टात जाण्याचा इशारा

पूजा यांनी हे अनुभव शब्दबद्ध करताना एक कविताही रचली. मोदी यांनी पत्राला उत्तर देताना म्हटले की, खडतर परिस्थितीतही तू, तुझ्या कुटुंबाने कोविड नियमांचे पालन करून विषाणूचा मुकाबला केल्याचा आनंद वाटतो. तू अशीच वाटचाल करशील.जीवनातील कोणत्याही आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाशील.

संयम हीच शास्त्रांची शिकवण

मोदी यांनी पूजा यांच्या पत्राला उत्तर देताना शास्त्रांचा संदर्भ दिला. संयम सोडायचा नाही आणि खडतर परिस्थितीत धैर्य कायम ठेवायचे हीच शास्त्रांची शिकवण असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. पूजाच्या पत्रातून मुलापासून दूर राहावे लागलेल्या मातेची चिंता आणि अधीरता व्यक्त होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com