पोस्टमास्तरचा IPL वर सट्टा, लोकांच्या एक कोटींच्या ठेवी उडवल्या

अनेक कुटुंबांनी सेव्हींग केलेल्या पैशातून आरोपी अहिरवार यांने सट्टा लावला.
viral
viralसकाळ

सट्टेबाजी ही अत्यंत वाईट सवय असून बेकायदेशीर आहे. मात्र सध्या ऑनलाइन सट्टेबाजी दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाईन सट्टेबाजीसाठी कोणतीही कारवाई केली जात नाही.त्यामुळे ऑनलाईन सट्टेबाजी करताना अटी आणि शर्ती देखील सांगितल्या जातात कारण सट्टेबाजी हे व्यसन व्यक्तीला कोणतेही पाऊल उचलण्यास भाग पाडते. आता अशीच एक घटना मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातून समोर आली आहे.

viral
कर्नाटकात मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडले; विहिंप-बजरंग दल आक्रमक

विशाल अहिरवार नावाची व्यक्ती सागर जिल्ह्यातील बिना पोस्ट ऑफिसमध्ये डेप्युटी पोस्टमास्टर म्हणून कामावर होता. यात विशालने फसवणूक केल्याचा आरोप काही गुंतवणूकदारांनी केलाय तर अहिरवार यांनी कधीही गुंतवणूकदारांचे पैसे जमा केले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अनेक कुटुंबांनी सेव्हींग केलेल्या पैशातून आरोपी अहिरवार यांने सट्टा लावला. विशाल हा गेल्या 2 वर्षांपासून सुमारे 24 कुटुंबांच्या लाखो रुपयांमधून आयपीएलमध्ये सट्टा लावत होता.

viral
weather Update : मान्सून २७ मे रोजी केरळात होणार दाखल

पोस्ट ऑफिसच्या फ़िक्स्ड डिपोज़िट अकाउंटमधून विशालने सट्टा लावल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तो व्हिसाधारकांना पासबुक द्यायचा पण पैसे जमा करण्याऐवजी त्यांच्याशी सट्टा लावायचा आणि जेव्हा लोक पैसे काढण्यासाठी आले असता त्यांच्या खात्यात पैसे नसल्याचे सांगण्यात आले. विशालने सट्ट्यामध्ये निष्पाप कुटुंबांची सुमारे 1 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

viral
कर्नाटकात मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडले; विहिंप-बजरंग दल आक्रमक

विशाल अहिरवार यांना यापूर्वी ही निलंबित केल्या गेले आहे. बीनापूर्वी ते सागर जिल्ह्यातील खिमलसा येथे होते. येथेही त्याने आर्थिक फसवणूक केली होती त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. विशालला बिना सरकारी रेल्वे पोलिसांनी अटक केली असून त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com