Amit Shah : भ्रष्टाचार संपविण्याचे सामर्थ्य केवळ भाजपमध्ये; केंद्रीय गृहमंत्री शहा यांचा दावा

ममता सरकारवर टीका
Amit Shah
Amit Shah esakal

करंदीघी ः ‘‘पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सत्ताकाळात सुरू असलेला भ्रष्टाचार, अराजकता आणि राज्यात होणारी घुसखोरी रोखण्याचे सामर्थ्य केवळ भाजपमध्ये आहे,’’ असा दावा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी मंगळवारी पश्‍चिम बंगालमधील रायगंज लोकसभा मतदारसंघातील करंदीघी येथील सभेत केला. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पश्‍चिम बंगालमधून ३५ जागा जिंकण्याचे पक्षाचे उद्दिष्ट असल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले.

Amit Shah
Dhule Drought News : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दुष्काळामुळे शुल्क माफी लागू

पश्‍चिम बंगालमध्ये २०१६मध्ये शिक्षक भरती परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने नुकतेच हजारो जणांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत त्याचा संदर्भ देत अमित शहा म्हणाले, ‘‘लाखभर रुपयांसाठी नोकरी विकण्यात येणे ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे. पश्‍चिम बंगालमधील लाचखोरीचे हे प्रकार बंद करण्याचे सामर्थ्य तृणमूल काँग्रेसमध्ये नाही हे प्रकार केवळ भाजपच बंद करू शकतो.’’

Amit Shah
Nashik News : एसटीत समन्वयाअभावी प्रवाशांना मनस्ताप! घाट दुरूस्तीसाठी बंद, तरीही तलवाडेचे तिकिट देत मध्येच उतरविले

नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल(सीएए) काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या विधानांचा संदर्भ देत शहा म्हणाले, ‘‘काँग्रेस असो की ममता ममता बॅनर्जी असोत ‘सीएए’ला हात लावण्याची कोणाचीही हिंमत नाही.’’ काँग्रेस आणि ममता यांना घुसखोरांनी मदत करायची आहे त्यामुळेच ते ‘सीएए’ला विरोध करत आहेत, असा दावाही शहा यांनी यावेळी केला.

शहा म्हणाले ...

-हिंदू विस्थापितांना सीएएचा लाभ होणार असल्यानेच तृणमूल आणि काँग्रेसचा ‘सीएए’ला विरोध

-ममता बॅनर्जी या महिला असूनही संदेशखाली प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालत आहेत ही शरमेची बाब

-ममता बॅनर्जी यांच्या डोळ्यांसमोर संदेशखाली येथील अत्याचार सुरू असूनही काही मतांसाठी लांगूलचालनाचे राजकारण सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com