Prem Mathur : जेव्हा ‘तिला’ ऐकवलं गेलं, एक महिला विमान कशी उडवू शकेल!  

Prem Mathur : जेव्हा ‘तिला’ ऐकवलं गेलं, एक महिला विमान कशी उडवू शकेल!  

...त्यामुळे एअरलाईन्स कंपन्या प्रेम माथूर यांना घ्यायला तयार नव्हत्या

स्पेसक्राफ्ट, हायस्पीड बाइक्स, बस, ट्रॅक्टर, रेल्वे असे कोणतेच वाहन नाही जे महिला चालवू शकत नाहीत. आज महिला पायलटही मोठ्या धाडसाने विमान उडवत उंच भरारी घेत आहेत. पण, एक काळ असा होता की जेव्हा कोणहे वाहन चालवायचे यातही लिंगाच्या आधारावर ठरवले जायचे. महिलांना त्यांच्या इच्छेनुसार काम करू दिले जात नव्हते. पण, त्याकाळातही काळातही काही महिलांनी पुढाकार घेऊन भविष्यातील महिलांसाठी नवीन मार्ग खुले केले.

त्यातीलच एक नाव म्हणजे प्रेम माथूर. या भारताच्या पहिल्या महिला वैमानिक आहेत. आजच्याच दिवशी त्यांची पायलट म्हणून निवड करण्यात आली होती. योगायोगाने आजच्याच दिवशी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही शपथ घेतली होती.आज प्रेम माथूर यांच्याबद्दल माहिती घेऊयात.  (Prem Mathur : prem Mathur first woman commercial pilot of independent india) 

Prem Mathur : जेव्हा ‘तिला’ ऐकवलं गेलं, एक महिला विमान कशी उडवू शकेल!  
Indira Gandhi Birth Anniversary: इंदिरा गांधीच्या 'या' 7 निर्णयांनी बदलला होता भारताचा इतिहास!

प्रेम माथूर यांचा जन्म 1924 मध्ये अलिगढ उत्तर प्रदेश येथे झाला. वडिलांच्या बदलीनंतर प्रेम आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब अलाहाबादला गेले. प्रेम यांचे संपूर्ण बालपण तिथेच गेले. ५ भावंडांपैकी सर्वात लहान असलेल्या प्रेमने अगदी लहान वयातच त्याची आई गमावली होती. प्रेम यांनी अॅनी बेझंट स्कूल, इविंग ख्रिश्चन कॉलेजमधून शालेय शिक्षण घेतले.

अलाहाबाद विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यांच्या पाच भावंडांपैकी यातील एक जण व्यावसायिक होता तर दुसरा वैमानिक प्रशिक्षण देत होता. प्रेम माथूर यांच्या घरातील वातावरण मोकळे होते. लहान असल्यापासून त्यांना घरातून खूप काही शिकायला मिळालं. घरातून चांगला आधार असल्याने प्रेम यांची अनेक कामात रुची वाढत होती.

Prem Mathur : जेव्हा ‘तिला’ ऐकवलं गेलं, एक महिला विमान कशी उडवू शकेल!  
First Female Airplane Pilot : आशियाची पहिली कमर्शियल पायलेट आहे भारतीय महिला

व्यावसायिक असणाऱ्या भावाने दुसऱ्या महायुद्धातील वापरलेली काही विमाने विकत घेतली आणि श्रीलंकेला विकली. या विमानांना घेऊन जायची जबादारी कॅप्टन अटल यांच्या खांदयावर टाकली. कॅप्टन अटल यांच्या सोबत काम करण्यासाठी प्रेम माथूर यांनी आग्रह केला. कॅप्टन अटल यांना काही हरकत नव्हतीच. कॅप्टन अटल आणि प्रेम माथूर यांनी ही विमाने श्रीलंकेला पोहचवली. दरम्यानच्या काळात कॅप्टन यांनी प्रेम हुशार असल्याचे ओळखले. आणि तिला ‘तू पायलट का होत नाही म्हणून विचारले.’

इथून पुढे पायलट झाल्याशिवाय शांत बसायचे नाही, असे ठरवूनच प्रेमजी तयारीला लागल्या. प्रेम यांना आधीपासून या विषयात आवड होती म्हणून त्यांच्यासाठी पायलट होणे तसे अवघड गेले नाही. १९४७ मध्ये अहमदाबाद फ्लाईंग क्लब कडून त्यांना अधिकृत परवाना मिळाला.

Prem Mathur : जेव्हा ‘तिला’ ऐकवलं गेलं, एक महिला विमान कशी उडवू शकेल!  
Women Pilot : जगात महिला वैमानिकांची संख्या भारतात सर्वाधिक; जाणून घ्या काय आहे खास

प्रेम माथूर पायलट झाल्यानंतर पायलट पदासाठी त्यांनी त्यावेळच्या महत्वाच्या एअरलाईन्स कंपन्यांकडे नोकरीसाठी अर्ज केला. प्रेम माथूर यांच्या अगोदर कोणी महिला पायलट नव्हतीच त्यामुळे एअरलाईन्स कंपन्या प्रेम माथूर यांना घ्यायला तयार नव्हत्या. काहींनी तर महिला असल्यामुळे घेऊ शकत नाही असा स्पष्ट शब्दात नकार कळवला. एका एअरलाईन्सने तर त्यांना अशा शब्दात उत्तर दिलं, जर आम्ही तुम्हाला पायलट म्हणून घेतलं विमान चालवणारी एक महिला आहे हे लोकांना कळल्यावर ते आमच्या विमानात बसायला तयार होणार नाहीत.

Prem Mathur : जेव्हा ‘तिला’ ऐकवलं गेलं, एक महिला विमान कशी उडवू शकेल!  
Pregnant Women : गर्भवतींना मानसिक तणावाचा वाढता धोका

प्रेम यांना पहिली ऑफर हैदराबादच्या निजामाची एअरलाइन डेक्कन एअरवेजकडून मिळाली. त्यांना विमान उडवण्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्या सर्वांमध्ये प्रेम उत्तीर्ण झाल्या. प्रेमचे हे पहिले काम होते. त्यात त्या यशस्वी झाल्या.

Prem Mathur : जेव्हा ‘तिला’ ऐकवलं गेलं, एक महिला विमान कशी उडवू शकेल!  
Health Tips : सकाळच्या 'या' चुका वाढवू शकतात तुमच्या कंबरेचा आकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com