esakal | पंतप्रधान मोदी आज पुण्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra-Modi

कोरोनाशी लढण्यासाठी देशात विकसित करण्यात येणाऱ्या तीन लशींच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. २८) पुण्यासह अहमदाबाद व हैदराबादचा दौरा करुन संबंधित संस्थांचे प्रमुख आणि वैज्ञानिकांशी चर्चा करणार आहेत. मोदींच्या दौऱ्याबाबत पंतप्रधान कार्यालयानेही (पीएमओ) पुष्टी दिली आहे.

पंतप्रधान मोदी आज पुण्यात

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - कोरोनाशी लढण्यासाठी देशात विकसित करण्यात येणाऱ्या तीन लशींच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. २८) पुण्यासह अहमदाबाद व हैदराबादचा दौरा करुन संबंधित संस्थांचे प्रमुख आणि वैज्ञानिकांशी चर्चा करणार आहेत. मोदींच्या दौऱ्याबाबत पंतप्रधान कार्यालयानेही (पीएमओ) पुष्टी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंतप्रधान उद्या सर्वप्रथम पुण्याला जातील. तेथे ते सीरम इन्स्टिट्यूटला भेट देतील आणि ऑक्‍सफर्डच्या सहकार्याने या कंपनीतर्फे बनविण्यात येणाऱ्या कोरोना लशीच्या प्रगतीचा आढावा घेतील. त्यानंतर मोदी हैदराबाद येथे भारत बायोटेकच्या प्रयोगशाळेला भेट देतील. हा उद्योग आयसीएमआरच्या सहकार्याने कोव्हॅक्सिन ही लस विकसित करत असून त्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या प्रगतिपथावर आहेत.

बिहार - भाजपने सुशील कुमार मोदींना राज्यसभेची उमेदवारी देऊन केली डबल गेम

त्यानंतर ते अहमदाबादला जाऊन जायडस कॅडिलातर्फे विकसित होणाऱ्या झायकोविड लशीच्या चाचण्यांचा आढावा घेतील. ‘पीएमओ’ने म्हटले आहे, की भारताने कोविड-१९ महामारीविरुद्ध लढाईच्या निर्णायक टप्प्यात प्रवेश केला आहे. हे पाहता पंतप्रधान मोदी कोरोना लस विकसित करणाऱ्या देशातील तीनही संस्थांचा दौरा करतील. तेथे ते लशीच्या प्रगतीबाबत वैज्ञानिकांशी चर्चा करतील. यामुळे त्यांना प्रस्तावित लसीकरण, लशीच्या प्रगतीत येणाऱ्या अडचणी व भारतीयांना करण्यात येणाऱ्या लसीकरणाबाबतचा दृष्टिकोन मिळण्यास मदत होईल.

Edited By - Prashant Patil

loading image