मैं रुकेगा नहीं! तुरुंगात राहून क्रॅक केली IIT परीक्षा; वाचा काय आहे प्रकरण

19 एप्रिल 21 पासून सूरजसहतुरुंगात असून त्याने गेल्या वर्षीही ही परीक्षा उत्तीर्ण केली होती.
IIT
IITsakal

पाटणा : खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात बंद असलेल्या एका कैद्याने तुंरूगात अभ्यास करून IIT ची संयुक्त प्रवेश परीक्षेसाठीची मास्टर्स (JAM) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. एवढेच नव्हे तर, त्याने आयआयटी रुरकीने (IIT Rurkee) घेतलेल्या या परीक्षेत संपूर्ण भारतात 54 वा क्रमांक पटकावला आहे. सूरज कुमार उर्फ कौशलेंद्र असे परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. सूरजच्या या यशात तुरुंग प्रशासनाचाही मोठा वाटा आहे. (Prisoner Cracked IIT Jam Exam)

IIT
मुंबई : मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिकेची मेट्रोवर कारवाई

सूरज जवळपास एक वर्षापासून एका खुनाच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून तुरुंगात असून, तो वारीस्लीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील मोस्मा गावचा रहिवासी आहे. मंडल कारा नवाडा येथे राहत असताना त्याने या कठीण परीक्षेची तयारी केली. यासाठी त्याला तुरुंग प्रशासनानेदेखील खूप मदत केली.

IIT
योगींच्या शपथविधीला 'द काश्मीर फाइल्स' ची टीमही राहणार उपस्थित

एप्रिल 2021 मध्ये गेला होता तुरुंगात

नवादा जिल्ह्यातील वारिसलीगंज ब्लॉकमधील मोस्मा गावात दोन कुटुंबांमध्ये रस्त्याच्या वादावरून जोरदार भांडण झाले होते. एप्रिल 2021 रोजी झालेल्या या वादात संजय यादव गंभीर जखमी झाले होते.त्यांना पाटणा येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृताचे वडील बासो यादव यांनी सूरज, त्याचे वडील अर्जुन यादव यांच्यासह नऊ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला. त्यानंतर 19 एप्रिल 21 रोजी पोलिसांनी या प्रकरणी सूरजसह चार जणांना अटक करून तुरुंगात पाठवले, तेव्हापासून सूरज तुरुंगात आहे.

IIT
मध्यमवर्गाचा हवाई प्रवासाकडे कल वाढणार; Airbus ने वर्तवला अंदाज

गेल्या वर्षीही यश मिळाले होते पण…

विशेष गोष्ट म्हणजे सूरजने गेल्या वर्षीही ही परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि संपूर्ण भारतात 34 वा क्रमांक मिळवला होता, मात्र अखेरच्या क्षणी तो या हत्येच्या घटनेत अडकला. मात्र, तुरुंगात गेल्यावरही सूरजचा उत्साह कमी झाला नाही आणि आज तुरुंगात असतानाही त्याने हा पराक्रम केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com