
एका काकाने धरले पाय, दुसऱ्याने हात तर तिसऱ्याने चिरला पुतण्याचा गळा
मेरठमध्ये सरेराह बीच मार्केटमध्ये तरुणाची चाकूने भोसकून हत्या (Murder) करण्यात आली. मालमत्तेच्या वादातून तरुणाच्या काकांनी साथीदारांसह चाकूने हल्ला करून हत्या केल्याचा आरोप आहे. हा घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. साजिद असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना मेरठच्या ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन परिसरात घडली. (Property dispute Murder of nephew)
ईदनिमित्त रविवारी मेरठच्या इत्तेफाकनगर भागात मोठी गर्दी होती. शेजारील तारापुरी बाजारात दुपारी लाखोंच्या संख्येने लोक खरेदी करीत होते. रोजेदार जवळच्या मशिदीतून नमाज अदा करून बाहेर पडत होते. दरम्यान, नमाज अदा करून जाणाऱ्या साजिदला अचानक तिघांनी अडवले आणि जमिनीवर पाडले. यानंतर त्यांनी साजिदवर चाकूने (knife) वार करून गंभीर जखमी केले. यानंतर धारदार शस्त्राने गळू चिरून खून (Murder) केला. मारेकरी दुसरे कोणी नाही तर साजिदचे तीन काका होते.
हेही वाचा: जितेंद्र आव्हाड म्हणतात, मंगेशकर कुटुंबीयांनी मराठी माणसाचा अपमान केला
साजिद रस्त्यावर येताच तिघेही मागे धावले आणि पकडून जमिनीवर पाडले. एका काकाने साजिदचे पाय धरले तर दुसऱ्याने हात धरला. यानंतर तिसऱ्या काकाने साजिदवर चाकूने वार केला. हल्ला करणाऱ्या काकांनी आधी साजिदच्या पोटावर, छातीवर आणि इतरत्र आठ वार केले. यानंतर हल्लेखोर पळू लागले. मात्र, साजिद जिवंत होता. यामुळे काकांनी साजिदचा गळू चिरून खून केला. मृत्यू झाल्याचे पाहून तिन्ही काका पळून गेले.
दोन कोटींच्या मालमत्तेसाठी खून
साजिदच्या आजोबांची १६० यार्डांची बाजारपेठ आणि १०० यार्डांचे घर आहे. दोन्ही मालमत्ता शहरातील लिसाडी गेट रोडवर आहेत. दोघांची किंमत १.५० ते २ कोटींच्या आसपास आहे. या मौल्यवान मालमत्तेत (Property dispute) वाटा देण्यास विरोध झाल्याने तिघा काकांनी मोठा भाऊ युनूसच्या मुलाची हत्या केली.
हेही वाचा: मंडपात वराचा हात पाहून वधूने दिला लग्नाला नकार; सर्वांना बसला धक्का
सहा आरोपींना अटक
सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आणि घटनेची माहिती मिळताच पोलिस आरोपींना पकडण्यात व्यस्त आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ६ जणांना ताब्यात घेतले आहेत. तसेच मुख्य आरोपींचा शोध घेत आहेत.
कुणीही केली नाही मदत
मेरठच्या गजबजलेल्या भागात रस्त्याच्या मधोमध साजिदवर चाकूने हल्ला करण्यात आला आणि आरडाओरडा करूनही त्याला कोणी वाचवायला आले नाही. आरोपींना रोखण्याचे किंवा पकडण्याचे धाडस कोणी दाखवले नाही. हा प्रकार रस्त्यावर सुरू होता आणि घटना घडल्यानंतरही बराच वेळ जखमी रस्त्यावर पडून होता. मात्र, रस्त्यावरून येणारे सर्वजण पुढे निघून गेले. थोड्या वेळाने पोलिस आले आणि जखमीला ऑटोमधून रुग्णालयात नेले. जिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
Web Title: Property Dispute Murder Of Nephew Crime News Attack With A Knife
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..