'दो बूंद जिंदगी की'; पोलिओ लसीकरणाला आजपासून सुरुवात

pulse polio
pulse polio
Updated on

नवी दिल्ली- कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या पल्स पोलिओच्या अभियानाला रविवारपासून सुरुवात होत आहे. हे अभियान 17 जानेवारीपासून सुरु केले जाणार होते, पण कोरोना लसीकरण सुरु करण्यात आल्याने ते पुढे ढकलण्यात आले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी सकाळी काही बाळांना पोलिओ ड्रॉप पाजून अभियानाचा शुभारंभ केला होता. 

2 जानेवारीपर्यंत अभियान सुरु आहे

अभियानाअंतर्गत 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना पोलिओ ड्रॉप पाजवले जाणार आहे आणि हे अभियान 2 जानेवारीपर्यंत चालेल. पोलिओ लसीकरण ज्यादिवशी सुरु होते, त्या दिवसाला राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरे केले जाते. 

कृषी आंदोलनाचा आज 67 वा दिवस; पंतप्रधान मोदींची आज 'मन कि बात'

पोलिओ लसीकरण अभियान वर्षात दोनदा आयोजित केले जाते. कोरोना महामारीमुळे यावेळी पोलिओ अभियानाला उशीर झाला. पोलिस अभियानासाठी कोरोना लसीकरण तीन दिवसासाठी थांबवले जाण्याची शक्यता आहे. पण, याबाबत निश्चित माहिती देण्यात आलेली नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com