विषारी दारू प्यायल्याने 21 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जुलै 2020

आंध्रप्रदेशात दाऱुऐवजी सॅनिटायझर प्यायल्यानं 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता विषारी दारुमुळे 21 जण दगावल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली - आंध्रप्रदेशात दाऱुऐवजी सॅनिटायझर प्यायल्यानं 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता विषारी दारुमुळे 21 जण दगावल्याची घटना घडली आहे. पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने 21 लोकांचा मृत्यू झाल्याच्या प्रकऱणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने राज्यातील अमृतसर, तरनतारन आणि गुरुदासपूर इथं 21 लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीनंतर मुख्यमंत्र्यांनी चोकशीसाठी आदेश दिले. 

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, मी अमृतसर, गुरुदासपूर, तरनतारन इथं विषारी दारुमुले झालेल्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जालंधर विभागाचे पोलिस आयुक्त चौकशी करतील आणि संबंधित एसएसपी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत समन्वय राखतील. याप्रकऱणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

पंजाबमध्ये विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा प्रकार होण्याआधी आंध्र प्रदेशातही धक्कादायक घटना घडली आहे. दारू न मिळाल्याने लोक चक्क सॅनिटायझर प्यायले. यामुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 20 जणांनी सॅनिटायझर प्यायलं असल्याची माहिती मिळाली आहे. सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. प्रकाशम जिल्ह्यातील कुरीचेडु भागात ही घटना घडली आहे. सॅनिटायझर प्यायल्याने पहिला मृत्यू बुधवारी झाला होता. तर गुरवारी तिघांचा आणि शुक्रवारी सहा लोकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकऱणाची चौकशी सुरु केली आहे. 

हे वाचा - दारु मिळाली नाही म्हणून पिलं सॅनिटायझर; 9 लोकांचा मृत्यू

याप्रकरणाची अधिक चौकशी केली असता दुकानांमधून मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझरची विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. लोकसुद्धा दारुऐवजी सॅनिटायझर पीत आहेत. स्थानिक दुकानांमधून सॅनिटायझर जप्त करण्यात आले असून चाचणीसाठी ते लॅबमध्ये पाठवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: punjab 21 deaths due to toxic liquor cm orders inquiry