अरविंद केजरीवाल यांच्यावर पंजाब CM चन्नी दाखल करणार मानहानीचा खटला

channi
channi esakal

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (punjab CM Charanjit singh channi) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (delhi cm arvind kejriwal) यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहेत. जाणून घ्या सविस्तर..

चन्नींचा केजरीवाल यांच्यावर आरोप

ईडीने (ED) पंजाबमध्ये काँग्रेस नेत्याच्या पुतण्यासह अनेक ठिकाणी छापे टाकल्यानंतर केजरीवाल यांनी चन्नी यांनी अप्रामाणिक व्यक्ती म्हणून संबोधले होते. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी बुधवारी म्हटले होते की, चन्नी हा सामान्य माणूस नसून एक अप्रामाणिक माणूस आहे. केजरीवाल यांना इतरांची प्रतिमा खराब करण्यासाठी आरोप करण्याची सवय आहे, असा आरोप चन्नी यांनी केला. याच कारणामुळे त्यांना नंतर भाजप नेते नितीन गडकरी, दिवंगत अरुण जेटली आणि एसएडी नेते बिक्रम सिंह मजिठिया यांची माफी मागावी लागली. चमकौर साहिबमध्ये पत्रकारांशी बोलताना चन्नी म्हणाले की केजरीवाल यांनी आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि आप नेत्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याची परवानगी देण्याची विनंती त्यांच्या पक्षाला केली आहे.

केजरीवाल यांच्या विरोधात मानहानीचा खटला

''मी केजरीवाल यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असून त्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती मी माझ्या पक्षाला केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मला तसे करण्यास भाग पाडले आहे. ते मला बेईमान म्हणत असून केजरीवालांनी आपल्या ट्विटर हँडलवर तशी पोस्ट टाकली आहे. सीएम चन्नी यांच्या नातेवाईकांवर ED ने छापे टाकल्यानंतर विरोधी पक्षांनी, विशेषत: 'आप'ने चन्नी आणि काँग्रेसवर हल्ला चढवला.''

channi
'अमर जवान ज्योती' आणि 'राष्ट्रीय युद्ध स्मारक' यात फरक काय?

माझ्या फोटोंसोबत नोटांच्या बंडलांचे फोटो का टाकले जात आहेत? चन्नींचा प्रश्न

तत्पूर्वी, केजरीवाल यांनी दावा केला होता की चन्नी पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चमकौर साहिब मतदारसंघातून पराभूत होतील, तर चन्नी यांच्या पुतण्याच्या घरातून कोट्यवधी रुपये जप्त केल्याने लोकांना धक्का बसला आहे. केजरीवाल यांच्या या वक्तव्यावर चन्नी यांनी उत्तर दिले की, छापेमारीत जप्त केलेल्या नोटांचे बंडल दाखवत माझा फोटो टाकून त्यांनी मला बेईमान म्हणावे.

सोशल मीडिया अकाउंटवर माझ्या फोटोंसोबत नोटांच्या बंडलांचे फोटो का टाकले जात आहेत, असे चन्नी म्हणाले. मला काय पैसे मिळाले, यात माझा काय दोष? मला यात का ओढत आहेत? दुसऱ्याचे काही पैसे जप्त झाले… पंजाबमध्ये दहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. तुम्ही मला याच्याशी का जोडत आहात?

channi
इंडिया गेटवर बसवणार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा, मोदींची घोषणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com