पाकिस्तानी नागरिकांना राफेलची भीती; गुगलवर शोधतायत माहिती

वृत्तसंस्था
Friday, 31 July 2020

अनेकांनी भारतीय हवाई दलाबद्दल विस्ताराने माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. एफ-१६ आणि राफेल यांत सर्वोत्तम विमान कोणते हे जाणून घेण्यातही अनेकांना उत्सुकता होती. 

नवी दिल्ली : अंबाला हवाई तळावर बुधवारी (ता.२९) राफेल विमानांचे आगमन होत असताना पाकिस्तानचे धाबे दणाणून गेले होते. याचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले. राफेल विमानांची माहिती मिळविण्यासाठी अनेक पाकिस्तानी नागरिकांनी गुगलचा आधार घेतला. त्यामुळे गुगल सर्चमध्ये राफेल हा ट्रेंड आघाडीवर राहिला. जगातील सर्वोत्तम लढाऊ विमान, राफेल विमानाची किंमत असे पर्याय देऊन माहिती मिळविली जात होती. 

२८९२ कोटींच्या कर्जापायी अनिल अंबानींनी गमावले मुख्यालय; येस बँकेने केली कारवाई​

वास्तविक गेल्या दोन दिवसांपासूनच पाकिस्तानी नागरिकांना राफेलबद्दल कुतूहल होते. या लढाऊ विमानांचे फ्रान्सहून आगमन होण्याच्या दिवशी उत्सुकता शिगेला पोचली. सकाळपासून राफेल ट्रेंडने सर्च इंजिन आणखी सक्रिय केले. मग संध्याकाळपर्यंत हा टॉप ट्रेंड बनला. सिंध, बलुचिस्तान, गिलगीट-बाल्टीस्तान, पंजाब, खैबर पख्तुनख्वा अशा विविध प्रांतांच्या बाबतीत हेच चित्र होते. अनेकांनी भारतीय हवाई दलाबद्दल विस्ताराने माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. एफ-१६ आणि राफेल यांत सर्वोत्तम विमान कोणते हे जाणून घेण्यातही अनेकांना उत्सुकता होती. 

1 ऑगस्ट पासून बदलणार 10 नियम, तुम्हाला बसू शकतो आर्थिक फटका​

चीन आणि पाकिस्तान यांच्याविरुद्धच्या संघर्षात राफेल विमाने निर्णायक कलाटणी देणारी भूमिका (गेमचेंजर) बजावतील असे अनेक तज्ञांना वाटते. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना अधिकाधिक माहिती हवी होती हे यावरून दिसून आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rafale was forefront trend on Google in Pakistan on July 29th 2020