
युक्रेनमधुन विद्यार्थ्यांना तात्काळ हलवा, राहुल गांधीचे मोदी सरकारला आवाहन
रशिया आणि युक्रेनच्या युद्धाने संपुर्ण राष्ट्रांच्या चिंतेत भर पडली आहे.हे युद्ध लवकरात लवकर संपावे,यासाठी सर्व स्तरातुन प्रयत्न केले जात आहे.यातच काही भारतीय विद्यार्थी युक्रेन (Ukraine) मध्ये अडकल्याने त्यांना माघारी आणण्याकरीता शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या काही विद्यार्थ्यांचे व्हिडीओ सोशल मिडिया वर वायरल होत आहे.यातच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी युक्रेनमधील विद्यार्थ्यांचा एक व्हिडीओ पोस्ट केलाय.
हेही वाचा: Video : हेमा मालिनी म्हणतात, युद्ध थांबवतील ते मोदीच; जगाला आहे विश्वास
राहुल गांधी यांनी व्हिडीओ पोस्ट करत ट्वीटद्वारे भारत सरकारला तेथील विद्यार्थ्यांची सुटका करण्याचे आवाहन केले आहे.राहुल गांधी ट्वीटद्वारे म्हणाले,”बंकरमधील अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे दृश्य त्रासदायक आहे. पूर्व युक्रेनमध्ये जोरदार हल्ले होत आहे,तिथे अनेक जण अडकले आहेत. मला त्या कुटुंबियांची चिंता वाटते. मी पुन्हा भारत सरकारला तेथील विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका करण्याचे आवाहन करतो.
Web Title: Rahul Gandhi Appeal To Government Of India To Execute Urgent Evacuation Of Students From Ukraine
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..