गलवान खोऱ्यात झेंडा फडकावत चीनची कुरघोडी; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

Rahul Gandhi
Rahul Gandhi file Photo

नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या औचित्याने लडाखमधील गलवान खोऱ्यायमध्ये चीनी सैनिकांनी (China) आपला ध्वज फडकावला आहे. तसेच या खोऱ्यावर आपला ताबा असल्याचंच एकप्रकारे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. याचे व्हिडीओ चीन सरकारने आपल्या अधिकृत वृत्तवाहिनीवरुन प्रसारितही केले आहेत. या सगळ्या प्रकाराबाबतच आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींच्या ५६ इंची दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Rahul Gandhi
रुग्णसंख्येचा उद्रेक! राज्यात आज ५० ओमिक्रॉन बाधित; 36 रुग्ण एकट्या पुण्यातले

त्यांनी म्हटलंय की, चीनला उत्तर द्यायला हवं. यासाठी पंतप्रधान मोदींनी तोंड उघडलं पाहिजे. चीनचा सरकारी मीडिया ग्लोबल टाइम्सने एक जानेवारी रोजी आपल्या चीनी सैनिकांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्या व्हिडीओला कॅप्शन दिलंय की, भारतीय सीमेजवळ गलवान खोऱ्यामध्ये चीनचे नागरिक नव्या वर्षासाठी शुभेच्छा देत आहेत.

या व्हिडीओमध्ये ज्याठिकाणी चीनी सैनिक उभे आहेत, त्याच्या मागील डोंगरावर चीनी भाषेत लिहंलय की, आम्ही एक इंचही जमीन देणार नाही. तर दुसरीकडे चीनी सैनिकांनी जाहिर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, त्याठिकाणी चीनचा झेंडा देखील फडकावला आहे. भारताने अद्याप तरी अधिकृत रित्या कसल्याच प्रकारचे उत्तर चीनला दिलं नाहीये.

Rahul Gandhi
VIDEO: बुलेटवर हवा करणाऱ्यांची पोलिसांनी काढली हवा

या सगळ्या प्रकारावर संताप व्यक्त करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी ट्विट करत म्हटलंय की, गलवानमध्ये आपला तिरंगाच चांगला दिसतो. चीनला सडेतोड उत्तर द्यावचं लागेल. मोदीजी, तुमचं तोंड उघडा! याआधी देखील राहुल गांधींनी चीनच्या या उद्दाम वागण्याला उत्तर न देण्यावरुन मोदींवर निशाणा साधला आहे.

पॅगाँग लेक परिसरामध्ये झालेल्या हिंसेमुळे पाच मे, २०२० रोजी भारतीय आणि चीन सैनिकांमधील तणाव वाढला होता. १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यामध्ये चीन सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीमध्ये २० भारतीय सैनिक शहिद झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com