esakal | भाजपवाले खोटे हिंदू : राहुल गांधी
sakal

बोलून बातमी शोधा

राहुल गांधी

भाजपवाले खोटे हिंदू : राहुल गांधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीआधी धार्मिक मुद्द्यांवर आरोप प्रत्यारोपांची धुळवड सुरू झाली असताना त्यात कॉंग्रेस नेते राहुल गांधींनीही उडी घेतली असून भाजपवर खोट्या हिंदुत्वाचा प्रहार केला आहे. भाजपवाले खोटे हिंदू आहेत. ते केवळ हिंदू धर्माचा वापर करतात आणि धर्माची दलाली करतात, असा खळबळजनक आरोप राहुल गांधींनी आज केला. खरेपणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी भितात, असा आरोपही गांधी यांनी केला. .

महिला काँग्रेसतर्फे दिल्लीत झालेल्या कार्यक्रमामध्ये राहुल गांधींनी आरएसएसवाले, भाजपवाले आणि सावरकरवादी विचारसरणी अशी शब्दावली वापरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. तसेच या विचारसरणीशी कॉंग्रेस कधीही तडजोड करणार नसल्याचाही दावा केला. लक्ष्मी, दुर्गा या देवतांची शक्ती मोदी सरकारने कमी केली, असा प्रहार करताना राहुल गांधी म्हणाले, की लक्ष्मी ही लक्ष्यपूर्तीची देवता आहे तर दुर्गा ही शक्तीची देवता आहे.

हेही वाचा: अहो आश्‍चर्यम्‌..! भर पावसात रंगला खेळ डांबरीकरणाचा..!

या शक्ती घराघरांत पोहोचविण्याचे काम प्रत्येक राजकीय व्यक्तीचे असते. पण नोटाबंदी, जीएसटीसारखे निर्णय लादून मोदींनी लक्ष्मीची, दुर्गेची शक्ती कमी केली आहे. ते (भाजप) स्वतःला हिंदू पक्ष म्हणवतात आणि संपूर्ण देशात लक्ष्मी, दुर्गेवर आक्रमण करतात. सत्ताधाऱ्यांना चिमटा काढताना राहुल म्हणाले, की संघ, भाजपवाले म्हणतात की ते हिंदूंचा पक्ष आहे. मागील शंभर दोनशे वर्षात ज्या व्यक्तीने संपूर्ण हिंदू धर्म नीट समजून घेतला आणि आचरणात आणला ती व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी. हे आरएसएसलाही मान्य आहे. महात्मा गांधींनी संपूर्ण आयुष्य हिंदू धर्म समजून घेण्यात खर्ची घातले असेल तर आरएसएसच्या, भाजपच्या तसेच सावरकरांच्या विचारसरणीने, गोडसेने त्या हिंदूंच्या (महात्मा गांधी) छातीत तीन गोळ्या का झाडल्या?, असा सवाल केला. तसेच, देशात भाजप आणि संघाचे सरकार आहे. त्यांची विचारसरणी आणि आमची विचारसरणी वेगळी आहे. कॉंग्रेस कार्यकर्ता म्हणून आपण इतर विचारसरणींशी काही तरी तडजोड करू. मात्र आरएसएस-भाजपच्या विचारसरणीशी तडजोड केली जाणार नाही, असा इशाराही दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही राहुल गांधींनी टीकास्त्र सोडले. मोदींनी सांगितले की आपली जमीन कोणीही घेतली नाही. चीनने हजारो किलोमीटर जमीन बळकावली. पण देशाचे पंतप्रधान वेगळाच सूर लावतात, असे ते म्हणाले.

loading image
go to top