राहुल गांधींनी नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख करताच सत्ताधाऱ्यांचा गोंधळ; शहा, राजनाथ सिंहसुद्धा आक्रमक

Rahul Gandhi Speech in Loksabha : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर चर्चेदरम्यान राहुल गांधींच्या भाषणावेळी सभागृहात गदारोळ झाला. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या भाषणावर आक्षेप घेतला.
Shah And Rajnath Singh Go Aggressive Against Rahul Gandhi

Shah And Rajnath Singh Go Aggressive Against Rahul Gandhi

Esakal

Updated on

अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेवेळी राहुल गांधी यांचं भाषण सुरू असताना सभागृहात सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. राहुल गांधी यांनी माजी जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला. या पुस्तकाचा उल्लेख करण्यास सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. दहशतवादाशी लढतात असं हे सांगतात पण मग मी जे बोलणार आहे त्याला का घाबरतायत? या पुस्तकात काय लिहिलंय ज्याला ते घाबरतायत? असा सवाल राहुल गांधी यांना विचारला आहे. जर यात घाबरण्यासारखं काही नसेल तर मला हे वाचू द्यावं अशी विनंती राहुल गांधी यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com