इव्हेंट संपला! लसीकरण कमी झाल्यानं राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला

Rahul-Gandhi-Pm-Modi
Rahul-Gandhi-Pm-Modi
Summary

बर्थडेला विक्रम नोंदवला आणि दुसऱ्याच दिवशी लसीकरण कमी झाल्यानं पुन्हा एकदा राहुल गांधींनी कार्यक्रम संपला असं म्हणत मोदी सरकारला टोला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिनी देशात १७ सप्टेंबरला विश्वविक्रमी लसीकरण झाले. यानंतर देशात राजकारणही तापलं होतं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी ट्विट करून म्हटलं होतं की,'देशाला आणखी काही दिवसांची प्रतिक्षा आहे ज्या दिवशी २.१ कोटी डोस दिले जातील.' दरम्यान, बर्थडेला विक्रम नोंदवला आणि दुसऱ्याच दिवशी लसीकरण कमी झाल्यानं पुन्हा एकदा राहुल गांधींनी कार्यक्रम संपला असं म्हणत मोदी सरकारला टोला लगावला आहे.

देशात १७ सप्टेंबरला एका दिवसात २.३१ कोटी लोकांना डोस देण्यात आले होते. त्यानंतर १८ डिसेंबरला ८५ लाख ४२ हजार डोस देण्यात आले. यावरून राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी ट्विटरवर लसीकरणाच्या आकडेवारीवरून आलेख शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, १७ सप्टेंबरचा आलेख हा वरती गेला आहे तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो खाली आला आहे.

Rahul-Gandhi-Pm-Modi
देशातील कोरोना रुग्णाच्या संख्येत घट; पॉझिटिव्हीटी रेटही कमी

राहुल गांधींनी ग्राफ शेअर करताना फक्त दोनच शब्दात टीका केली आहे. त्यात राहुल गांधींनी 'इव्हेंट खत्म' असा कॅप्शन दिलं होतं. राहुल गांधींनी शनिवारी उपरोधिक टीका करताना म्हटलं होतं की, देशाला आणखी २.१ कोटी डोस दिले जातील अशा दिवसांची गरज आहे. देशाला अशाच वेगाने लसीकरणाची गरज आहे असंही राहुल गांधींनी म्हटलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिनी झालेल्या लसीकरणाच्या विक्रमानंतर राजकीय प्रतिक्रियासुद्धा येत होत्या. त्यानतंर मोदींनी गोव्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांशी बोलताना यावर उत्तर दिलं होतं. मोदी म्हणाले होते की, लस घेतल्यानंतर एखाद्याला ताप येतो. तो जास्त झाला तर डोक्यावर परिणाम होतो असंही म्हणतात पण विक्रमी लसीकरणाने देशातील एका राजकीय पक्षाला ताप आला आहे अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसचे नाव न घेता टोला लगावला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com