रेल्वेचे प्रवासी घटले; मालवाहतूक मात्र विक्रमी

कोरोनाच्या जागतिक साथीच्या दुसऱ्या लाटेचा फटका रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीला यावेळीही बसला असून लांब पल्ल्याच्या सुमारे १७५ गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत.
Railway Transport
Railway TransportSakal

नवी दिल्ली - कोरोनाच्या (Corona) जागतिक साथीच्या दुसऱ्या लाटेचा फटका रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीला (Railway Passenger Transport) यावेळीही बसला असून लांब पल्ल्याच्या सुमारे १७५ गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. दुसरीकडे रेल्वेने एप्रिल महिन्यात १११.५३ मेट्रिक टन मालवाहतूक (Freight) करून विक्रमही नोंदवला आहे.

दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) लागू आहे. परिणामी लोक रेल्वे प्रवासाला कमी संख्येने निघत आहेत. याचा परिणाम रेल्वे गाड्यांवरही झाला आहे. अपेक्षेइतके आरक्षण मिळाले नसल्याने गेल्या महिनाभरात रेल्वेने लांब पल्ल्याच्या दोनशे गाड्या रद्द केल्या. एप्रिलच्या अखेरच्‍या आठवड्यातच सव्वाशे गाड्या रद्द कराव्या लागल्या. प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हा फटका रेल्वेला सलग दुसऱ्या वर्षी बसला आहे.

कोरोना संसर्गामुळे विविध राज्यांमध्ये होणारी आंतरराज्य प्रवासी वाहतूक घटली आहे. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत देशभरात रेल्वे मंत्रालय दररोज १५१४ विशेष मेल प्रवासी गाड्यांचे संचालन करीत होते. मे महिन्याच्या सुरवातीला ही संख्या १३९० चाही खाली आली आहे. दरवर्षी उन्हाळी सुट्टी निमित्त सोडल्या जाणाऱ्या गाड्यांची संख्याही ३९० इतकी घटली आणि १२ एप्रिल नंतर त्यातही केवळ १८७ गाड्या प्रत्यक्ष धावल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात १२४ प्रवासी गाड्या रद्द कराव्या लागल्या.

Railway Transport
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

मालवाहतुकीचा विक्रम

प्रवासी वाहतुकीला फटका बसला तरी रेल्वेने यंदा एप्रिलमध्ये मालवाहतुकीचा विक्रम केला आहे या संपूर्ण महिनाभराच्या काळात रेल्वेने १११.५३ मेट्रिक टन मालवाहतूक केली. कोरोना संकट येण्यापूर्वी म्हणजे २०१९ च्या एप्रिल महिन्यात हाच आकडा दरमहा १०१.०४ मेट्रिक टन इतका होता.

ऑक्सिजन एक्सप्रेससाठी पुढाकार

देशभरात ऑक्सिजनचा दुष्काळ जाणवू लागला तसे रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेस देशभरात सुरू केल्या. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांच्या म्हणण्यानुसार रेल्वेने एक मेपर्यंत २५ ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून २५ ऑक्सिजन एक्सप्रेस चालवल्या आणि ८१३ लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा विविध राज्यांना केला. ज्यात उत्तर प्रदेशाला २५ टॅंकर,महाराष्ट्राला १० मध्यप्रदेश १२, हरियानाला ५ आणि दिल्लीला ४ ऑक्सिजन टँकर पुरवण्यात आले. या शिवाय दिल्लीला आणखी ६, तेलंगण ५, हरियाना आणि मध्य प्रदेश प्रत्येकी २, उत्तर प्रदेश ३ अशा ऑक्सिजन एक्सप्रेस सध्या वाटेवर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com