
सध्यातरी लॉकडाऊन आणि कोरोना साथीच्या दरम्यान रेल्वेने कोणत्याही नियमित गाड्यांची वाहतूक सुरू केलेली नाही.
नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनच्या काळात भारतीय रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली होती. कोरोनाची परिस्थिती पूर्वपदावर हळूहळू यायला लागल्यावर काही स्पेशल ट्रेन्स सुरु करण्याच्या निर्णय घेतला गेला. अद्याप भारतीय रेल्वे पूर्णपणाने पूर्वपदावर आलेली नाहीये यादरम्यानच आता भारतीय रेल्वेने गुरुवारी आणखी 6 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या पूर्णपणे राखीव असणार आहेत, अशीही माहिती भारतीय रेल्वेकडून देण्यात आली आहे. सध्यातरी लॉकडाऊन आणि कोरोना साथीच्या दरम्यान रेल्वेने कोणत्याही नियमित गाड्यांची वाहतूक सुरू केलेली नाही. सर्व गाड्या विशेष पद्धतीने चालवल्या जात आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे वेळोवेळी विशेष गाड्यांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवत आहे. काल गुरुवारी उत्तर रेल्वेने आणखी 6 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या इंदूर-दिल्ली सराय रोहिल्ला, इंदूर-चंदीगड, इंदूर-उधमपूर, इंदूर-अमृतसर, वांद्रे टर्मिनल्स-हजरत निजामुद्दीन आणि मुंबई मध्य-नवी दिल्ली दरम्यान धावतील.
हेही वाचा - गलवान खोऱ्यात 5 जवान मारले गेल्याची पहिल्यांदाच चीनची कबुली; नावे केली जाहीर
या मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या धावतीलप्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे इंदूर - दिल्ली सराय रोहिल्ला, इंदूर - चंदीगड, इंदूर - उधमपूर, संबंधीत लोकांना कळविण्यात आले असल्याचे लिहिले आहे. इंदूर-अमृतसर, वांद्रे टर्मिनल-हजरत निजामुद्दीन आणि मुंबई मध्य-नवी दिल्ली या मार्गावर विशेष गाड्या चालवतील. उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांच्या संदर्भात ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
हेही वाचा - फेसबुकने दिला यूजरना धक्का
या आहेत विशेष रेल्वे गाड्या
09009/09010 मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल दुरंटो सुपर फास्ट एक्स्प्रेस द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस विशेष ट्रेन
09325/09326 इंदूर-अमृतसर-इंदूर द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन
02909/02910 बांद्रा टर्मिनस-हज़रत निज़ामुद्दीन-बांद्रा टर्मिनस गरीब रथ सुपर फास्ट आठवड्यातून 3 दिवस एक्सप्रेस विशेष ट्रेन
09337/09338 इंदूर-दिल्ली सराय रोहिल्ला-इंदूर साप्ताहिक विशेष ट्रेन
09307/09308-इंदूर-चंदीगड-इंदूर साप्ताहिक एक्सप्रेस विशेष ट्रेन
09241/09242 इंदूर-उधमपूर-इंदूर साप्ताहिक एक्सप्रेस विशेष ट्रेन