esakal | रेल्वेला आता ‘एआय’चा आधार
sakal

बोलून बातमी शोधा

Railway

रेल्वे मंत्रालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा ॲनालिटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी चालविली आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने हैदराबादेतील इंडियन स्कूल ऑफ बिझिनेस या संस्थेसोबत भागीदारी देखील केली आहे. ही संस्था रेल्वेकडून गोळा करण्यात आलेल्या डेटाचे विश्‍लेषण करण्याचे काम करेल, असे रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी सांगितले.

रेल्वेला आता ‘एआय’चा आधार

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - रेल्वे मंत्रालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा ॲनालिटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी चालविली आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने हैदराबादेतील इंडियन स्कूल ऑफ बिझिनेस या संस्थेसोबत भागीदारी देखील केली आहे. ही संस्था रेल्वेकडून गोळा करण्यात आलेल्या डेटाचे विश्‍लेषण करण्याचे काम करेल, असे रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुढील तीन महिन्यांमध्ये रेल्वेकडून सेंटर फॉर एक्सलेन्सची स्थापना करण्यात येईल. रेल्वेच्या प्रत्येक झोनमध्ये आता चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर  नेमण्यात येणार असून या अधिकाऱ्याचे काम हे अॅनालिटिक्स आणि आर्टिफीशियल इंटेलिजन्स (एआय) क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून ते मुख्य यंत्रणेमध्ये आणणे हे असेल, असे यादव यांनी स्पष्ट केले.

भारतीय लष्कराने वाढवलं निवृत्तीचं वय; वेळेआधीच निवृत्त झाल्यास पूर्ण पेन्शन नाही

‘पीआरएस’साठी माहितीचा वापर
आमच्याकडे प्रवासी, रेल्वे गाड्या, माल वाहतूक आणि मालमत्तेविषयीची माहिती मोठ्या प्रमाणावर आहे. आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ॲनालिटिक्स यांचा वापर करून त्याचे विश्‍लेषण करू. पुढे याच माहितीचा वापर हा पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टिममध्ये (पीआरएस) केला जाणार आहे. नव्या गाड्यांची सुरूवात आणि भविष्यातील मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी देखील याचा वापर करण्यात येईल असे यादव यांनी नमूद केले.

Breaking : आणखी ३ राफेल विमानं भारतात दाखल!

तब्बल ८८ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
हैदराबादेतील  संस्थेकडे कॅपेसिटी बिल्डिंग प्रोग्रॅमच्या उभारणीची जबाबदारी देण्यात आली असून ही संस्था औद्योगिक कामांमध्ये होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत एक सविस्तर अहवाल  तयार करेल. या बदलासाठी रेल्वेने मागील दोन महिन्यांमध्येच ८८ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. प्रत्येक झोन आणि विभागातील आणखी काही अधिकाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येईल.

हे वाचा - Bihar Election : 'EVM म्हणजे 'मोदी व्होटींग मशीन'; राहुल गांधींची घणाघाती टीका

मोठ्या संस्थांमध्ये प्रशिक्षण
प्रत्येक विभागातील सहा ते दहा अधिकारी आणि झोनल मुख्यालयातील जवळपास वीस अधिकाऱ्यांना डेट ॲनालिटिक्सि आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण हे आयआयटी, आयएसबी, आयआयएम, आयआयआयटीसारख्या संस्थांमध्ये पार पडेल. रेल्वे डेटा शेअरिंग प्रोटोकॉलच्या विकासावर देखील बारकाईने लक्ष ठेवून आहे. याचा वापर हा रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम, रेलटेल आदींसाठी करण्यात येईल.

कशाचे प्रशिक्षण?
अधिकाऱ्यांच्या ट्रेनिंग मॉड्यूलमध्ये क्लाउड कॉम्प्युटिंग. डेटा सायन्स, बिग डेटा ॲनालिटिक्स, आणि आर्टीफिशीयल इंटेलिजन्स आदी घटकांचा समावेश असेल. रेल्वेच्या प्रत्येक झोनमध्ये हा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी नेमला जाणार असून त्याच्याच जोडीला सहाय्यक मुख्य तंत्रज्ञान अधिकारी देखील असेल. हे दोन्ही अधिकारी थेट मुख्य व्यवस्थापक आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना आपल्या कामाची माहिती देतील.

Edited By - Prashant Patil