19 व्या शतकातील भारताचा इतिहास जाणून घेण्यास मदत झाली ते 'यांच्या' छायाचित्रांमुळे..

भारतीय इतिहासातील एक महान छायाचित्रकार म्हणून दीनदयाल यांना ओळखले जात होते.
raja deen dayal photography
raja deen dayal photography
Summary

भारतीय इतिहासातील एक महान छायाचित्रकार म्हणून दीनदयाल यांना ओळखले जात होते.

19 व्या शतकात राजा दीनदयाल (1844-1905) नावाचा एक प्रसिद्ध छायाचित्रकार भारतात होऊन गेला. आज आपण भारतीय इतिहासातील दुर्मिळ चित्रे पाहू शकतो ती दीनदयाळ यांनी रेखाटली होती. त्यांनी मुंबई, इंदूर आणि हैदराबादसह भारतातील इतर शहरांमध्ये अनेक स्टुडिओ सुरु केले होते. 50 हून अधिक छायाचित्रकारांना आणि सहाय्यकांना त्यांना नियुक्त केले होते. (raja deen dayal photography)

दीनदयाळ आणि त्यांच्या सहाय्यक छायाचित्रकारांनी भारतीय वास्तुकला, निसर्गचित्र आणि विविध माणसांची 30 हजारांहून अधिक छायाचित्रे टिपली होती. 1894 मध्ये दीन दयाल यांना हैदराबादच्या राजघराण्यात कोर्ट फोटोग्राफर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांना राजा लाला दीनदयाल या नावानेही ओळखले जाते.

raja deen dayal photography
मंत्री राकेश सचानवर गुन्हा कधी दाखल होणार? शिक्षेची ऑर्डर कॉपी घेऊन फरार

भारतीय इतिहासातील एक महान छायाचित्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीनदयाल यांचा जन्म 1844 मध्ये मेरठच्या सरधना येथे झाला. थॉमसन सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेज, रुरकी येथे त्यांनी तांत्रिक शिक्षण घेतले. त्यानंतर ते इंदूरमधील सार्वजनिक बांधकाम विभागात मुख्य अंदाजकार आणि ड्राफ्ट्समन म्हणून रुजू झाले. इंदूरचे शासक महाराजा तुकोजी दुसरे यांनी दीनदयाल यांना स्टुडिओ उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले.

आजही राजा दीनदयाळ यांच्या छायाचित्रांचा संग्रह भारतात काही मोजक्याच ठिकाणी पाहायला मिळतो मात्र दीनदयाळ यांची अनेक छायाचित्रे आजही 'रॉयल ​​ओंटारियो म्युझियम'मधील प्रदर्शनात पाहयला मिळतात...

raja deen dayal photography
Hyderabad : कैद्याने बंदुक सोडून केली पुस्तकांशी मैत्री; कारागृहात राहून मिळवल्या 3 पदव्युत्तर पदवी

1885 मध्ये ताजमहालचा दुर्मिळ आणि ऐतिहासिक फोटो काढण्याचे श्रेय राजा दीनदयाल यांना दिले जाते.

1899 मध्ये राजा दीनदयाल यांनी हैदराबादचा राजा निजाम, मेहबूब अली खान आणि त्यांच्या साथीदारांचे वाघाच्या कातडीसह पार्टीसाठी पोझ देतानाचे छायाचित्र टिपले आहे.

raja deen dayal photography
Travel : पिकनिकची तयारी करताय?, नवी मुंबईतील 'या' 7 बेस्ट स्थळांना नक्की भेट द्या

मार्च 1891 मध्ये राजा दीनदयाळ यांनी काढलेला रशियाचा ग्रँड ड्यूक अलेक्झांडर आणि सोबतींचा चित्त्याची शिकार केल्यानंतरचा हा फोटो प्रसिद्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com