पोलिसांनी 'त्या' बलात्कार पीडितेला तसं करायला शिकवलं : आसाराम बापू

Asaram Bapu
Asaram Bapuesakal
Summary

आश्रमात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोर्टानं आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय.

जोधपूर : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूच्या (Asaram Bapu) शिक्षेला आव्हान देणार्‍या अपीलनंतर, राजस्थान उच्च न्यायालयानं (Rajasthan High Court) आयपीएस अधिकाऱ्याला समन्स बजावलाय. आसारामनं आपल्या याचिकेत दावा केलाय की, पीडितेला पोलिसांनी शिकवलं असून ती पोलिसांच्या सांगण्यावरूनच वक्तव्य करत आहे, असं त्यांनी नमूद केलंय.

Asaram Bapu
Political News : अवघ्या 40 दिवसांत दुसऱ्यांदा भाजपात प्रवेश

आसारामला (Asaram) 2013 मध्ये जोधपूरमधील एका आश्रमात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ट्रायल कोर्टानं 2018 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जयपूरचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अजय पाल लांबा यांना आता 7 मार्चला न्यायालयात साक्षीदार म्हणून हजर राहण्यास सांगण्यात आलंय. आसारामच्या वकिलांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, आयपीएस अधिकाऱ्यानं केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगचा मुलीच्या साक्षीवर परिणाम झाला असावा, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळंच कोर्टानं आयपीएस अधिकाऱ्याला पुरावे नोंदवण्यासाठी समन्स बजावल्याचं समजतंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com