'त्या' काळवीटाचं उभारणार स्मारक; सलमानने मारल्याचा होता आरोप

'त्या' काळवीटाचं उभारणार स्मारक; सलमानने मारल्याचा होता आरोप

जयपूर : ‘हम साथ-साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी ज्या काळविटाची शिकार केल्याचा आरोप अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्यावर झाला होता त्याचे स्मारक (memorial) उभारण्यात उभारण्यात येणार आहे. त्या काळविटाच्‍या स्मरणार्थ आठ ते दहा एकर जमिनीवर वन व पशुपक्ष्यांसाठी संरक्षित क्षेत्र तयार करण्याचा निर्णय बिष्णोई समाजाने (Bishnoi community) घेतला आहे. तेथे वन्यप्राणी निर्धास्तपणे फिरू शकणार आहेत.

'त्या' काळवीटाचं उभारणार स्मारक; सलमानने मारल्याचा होता आरोप
'रक्ताची नाती म्हणजेच कुटुंब नसतं'; अर्जुनचा टोमणा कोणाला?

जोधपूरपासून २० किलोमीटर अंतरावर कनकानी गावात १९९८ मध्ये काळविटाची शिकार सलमान खानने केल्याचा आरोप या परिसरात राहणाऱ्या बिष्णोई समाजाने केला होता. त्याचा खटला अद्याप सुरू आहे. निसर्ग व पशुप्रेमी असलेल्या या समाजातील युवकांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या जागेवर काळविटाचे दफन केले होते, तेथे त्याचे स्मारक उभारण्यात येणार आहे. याशिवाय दहा एकर जमिनीवर एक हजार झाडे लावली जाणार आहेत. तेथे पशुपक्षी निर्धास्तपणे बागडू शकतील. या स्मारकाच्या माध्यमातून निसर्गावर प्रेम करण्याचा संदेश देण्यात येणार आहे. देगणी जमवून या सर्व कामाला प्रारंभ झाला आहे.

'त्या' काळवीटाचं उभारणार स्मारक; सलमानने मारल्याचा होता आरोप
कोविड पॉझिटिव्ह आल्या तरी म्हणतात की, करा एन्जॉय !

प्राणी आमच्या कुटुंबाप्रमाणे आहेत. आमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यांच्या बचावासाठी आम्ही आमच्या प्राणांची बाजी लावू शकतो, अशी प्रतिक्रिया प्रेम सरन या बिष्णोई समाजातील युवकाने दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com