Dress Code for Employees: सरकारी ऑफिसमध्ये चक्क जीन्स-टीशर्टवर बंदी, या राज्याने काढला नवा फतवा, काय आहे कारण?

Rajasthan Govt Comes Up With Dress Code for Employees: राजस्थानच्या सरकारी कार्यालयांमध्ये जेवणाच्या टेबलांचा मेनू बदलल्यानंतर आता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या ड्रेसबाबतही नव्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
Dress Code for Employees
Dress Code for EmployeesEsakal

Rajasthan Govt Comes Up With Dress Code for Employees: राजस्थानच्या सरकारी कार्यालयांमध्ये जेवणाच्या टेबलांचा मेन्यू बदलल्यानंतर आता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या ड्रेसबाबतही नव्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जीन्स आणि टी-शर्ट घालता येणार नाही. मुख्य सचिव सुधांश पंत यांच्या सूचनेनंतर सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत. आता सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सन्माननीय वेशात कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.

याबाबतचे आदेश जारी करताना सामान्य प्रशासन विभागाच्या सहसचिव नीतू राजेश्वर यांनी सांगितले की, मुख्य सचिव सुधांश पंत यांच्या अध्यक्षतेखाली २७ मार्च रोजी झालेल्या बैठकीत सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित पेहराव करावा, शिस्त पाळावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Dress Code for Employees
RAW Agents in Pakistan: पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करतोय भारत, पुलवामानंतर अधिक आक्रमक; 'दि गार्डियन'चा दावा

दरम्यान याआधी मुख्य सचिव सुधांश पंत यांनी कार्यालयांमध्ये होणाऱ्या बैठकांमधील जेवणाच्या पदार्थांमध्ये बदल केला होता. याआधी त्यांनी जयपूरमध्ये होणाऱ्या बैठकांमध्ये पदार्थ मागण्याबाबत मेन्यू निश्चित करण्यात आला आहे.

Dress Code for Employees
NCERT Political Science Book: बाबरी, गुजरात दंगल ते हिंदुत्वाचं राजकारण.. NCERTच्या पुस्तकातून काय काय वगळलं? नवीन अधिवेशनापूर्वी मोठा बदल

म्हणजेच जारी केलेल्या मेन्यूशिवाय इतर कोणत्याही खाद्यपदार्थाची ऑर्डर दिली जाऊ शकत नाही, ज्यामध्ये फक्त भाजलेले चणे, भाजलेले शेंगदाणे, मखना आणि मल्टी-ग्रेन डायजेस्टिव्ह बिस्किटे उपलब्ध केली जातील. हे पदार्थ हेल्दी स्नॅक्स म्हणून मीटिंगच्या मेन्यूमध्ये समाविष्ट केले आहेत. बैठकीत पिण्याच्या पाण्याबाबत मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या. आता फक्त बैठकांमध्येच काचेच्या ग्लासमध्ये आणि काचेच्या बाटलीमधून पाणी प्यावे लागेल.

Dress Code for Employees
Electoral Bond: इलेक्टोरल बाँडमुळे SBI चा खिसा देखील झाला गरम, सरकारकडून घेतले 10.68 कोटी रुपयांचे कमिशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com