राजीव गांधींच्या हत्येवेळी नेमकं काय घडलं होतं? | Rajiv Gandhi Assassination | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajiv Gandhi Assassination News

राजीव गांधींच्या हत्येवेळी नेमकं काय घडलं होतं?

राजीव गांधी यांचा मारेकरी पेरारिवलन ३० वर्षानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. यानिमित्त नेमकं राजीव गांधींच्या हत्येवेळी काय घडलं होतं? हे खुद हत्येतील आरोपी नलिनी हिने आपल्या आत्मचरित्रात सांगितले आहे. तर चला जाणून घेऊ या...

माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची २१ मे १९९१ मध्ये तामिळनाडूच्या श्रीपेरुंबुदूरमध्ये आत्मघातकी बाॅम्बस्फोटात हत्या करण्यात आली. या हत्येतील दोषी नलिनी श्रीहरन (Nalini Sriharan) हिने तामिळ भाषेत स्वतःचे आत्मचरित्र लिहिले आहे. 'राजीव कोलाई : मरिकापट्टा उनमैगलुम प्रियंका नलिनी संतिप्पम' असे त्या ५०० पानी आत्मचरित्राचे नाव आहे. यात नलिनी यांनी राजीव गांधी यांची कन्या प्रियांका गांधींशी झालेल्या भेटीबद्दल लिहिले आहे. याबरोबर राजीव गांधी यांच्या हत्येच्या कटाशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख नलिनी यांनी पुस्तकात केलाय. राजीव गांधी यांच्या हत्येच्या (Rajiv Gandhi Assassination) कटाबद्दल पतीसह आपल्याला काहीही माहिती नसल्याचा दावा नलिनी यांनी पुस्तकात केला आहे. सदरील पुस्तक वादग्रस्त ठरले होते. १९ मार्च २००८ मध्ये प्रियांका गांधी ( Priyanka Gandhi) यांनी नलिनीची भेट घेतली. त्यांनी तिच्याशी ९० मिनिटे चर्चा केली. राजीव गांधींच्या हत्येशी संबंध नसल्याचा सांगत आपण कोणत्या स्थितीत कैद झालो हे प्रियांका यांना सांगितले. २१ मे १९९१ मध्ये राजीव गांधींची आत्मघातकी हल्ल्यात हत्या करण्यात आली होती. यात मानवी बाॅम्ब धनुसहित १५ जण ठार झाले. (Rajiv Gandhi Assassination Day Story Told By Convict Nalini Sriharan In Her Autobiography)

हेही वाचा: राजीव गांधी हत्या ! दोषीने तुरुंगात अभ्यास करून जिंकले होते सुवर्णपदक

गरोदर असताना अटक

एलटीटीईसाठी (LTTE) काम करणाऱ्या श्रीहरनशी नलिनीने विवाह केला होता. तो श्रीलंकेचा रहिवासी होता. राहण्यासाठी घर शोधताना त्याची ओळख नलिनी हिच्याशी झाली. २१ एप्रिल १९९१ रोजी राजीव यांच्या हत्येनंतर नलिनीला अटक करण्यात आली. अटकेच्या वेळी ती दोन महिन्यांची गरोदर होती. २१ मे रोजी शुभा आणि धनुसोबत ती श्रीपेरुंबुदूरमधील राजीव गांधींच्या रॅलीत गेली होती. शुभा ही हल्ल्याचा सूत्रधार आणि लिट्टेचा गुप्तहेर म्हणून काम करणाऱ्या शिवरासनची चुलत बहीण हेती. रॅलीहून आल्यानंतर नलिनी पतीला रोयपेट्टामध्ये भेटणार होती.

मानवी बाॅम्बसोबत रॅलीत

राजीव गांधींना पाहता येणार म्हणून मी खूश होते. मी एका महान नेत्याला आणि माजी पंतप्रधानाला जवळून पाहणार होते, असे नलिनीने पुस्तकात म्हटले आहे. हत्येच्या दिवशी सकाळी सात वाजता शुभा आणि मानवी बाॅम्ब धनु यांच्यासोबत नलिनी रॅलीच्या ठिकाणी पोहोचली. त्यावेळी गर्दी नव्हती. पण हळुहळू गर्दी वाढू लागली. त्यानंतर आम्ही पाहिलं तेव्हा धनु आणि शिवरासन आमच्याबरोबर चालत नव्हते. मागे वळून पाहिलं तेव्हा त्यांच्यात भांडण सुरु होते. शुभाला मी याबाबत विचारलं तेव्हा तिनं सर्व काही ठिक असल्याचं सांगितले. काही वेळानंतर दोघेही आपल्याबरोबर असतील, असे शुभाने नलिनीला म्हणाली.

हेही वाचा: OBC Reservation : CM ठाकरेंनी राजीनामा द्यावा - चंद्रकांत पाटील

राजीव गांधी यांची रॅली

आम्ही व्हीआयपी गर्दीत कसे जाणार ? असा प्रश्न आम्हाला पडला. मात्र शिवरासनची सगळ्या व्हीआयपींशी ओळख होती. तो त्यांच्याशी बोलत होता. त्यानंतर तो फक्त धनुला आपल्यासोबत व्हीआयपी गर्दीत घेऊन गेला. शुभा आणि नलिनी महिलांच्या गर्दीत मिसळल्या. येथे संगीत कार्यक्रम सुरु होता. संगीत दिग्दर्शक शंकर-गणेश कार्यक्रम सादर करित होते. सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी राजीव गांधींच्या जोरदार घोषणा सुरु झाल्या. गर्दीमुळे काही दिसत नव्हते. पण लोकांनी सांगितले, की राजीव गांधी वाहनातून उतरले असून ते इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी निघाले. मात्र आम्ही जिथे उभे होतो. तेथून काही दिसत नव्हते.

हेही वाचा: टाटा करणार पाच ब्रँड्सची खरेदी? अंबानींच्या रिलायन्सला देणार टक्कर

हातातील संदेश

शुभाला पुढे चालण्यासाठी सांगितलं. मात्र तिने नकार दिला. तिन माझा हात पकडून व्यासपीठामागे नेले. मी तिला विचारल काय झालं? तिने मला गप्प राहण्यास सांगितले. त्यानंतर तिने माझा हात घट्ट पकडला. तिच्या त्या घट्ट हातांत एक संदेश होता. तो मला समजू शकला नाही, असा दावा नलिनीने आपल्या आत्मचरित्रात केला आहे.

Web Title: Rajiv Gandhi Assassination Day Story Told By Convict Nalini Sriharan In Her Autobiography

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top