
रामबन बोगदा अपघाताचे बचाव कार्य पूर्ण; दहा जणांचा मृत्यू
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील बांधकाम सुरु असलेल्या बोगद्याचा (Tunnel) काही भाग कोसळल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दहाही जणांचा मृत्यू झाला असून, सर्व मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. बाहेर काढण्यात आलेल्या 10 मृतांपैकी पाच जण पश्चिम बंगाल, एक आसाम, दोन नेपाळ तर, दोघे जण स्थानिक आहेत, अशी माहिती रामबनचे डीसी मुसरत इस्माल यांनी दिली आहे. तसेच हे हे ऑपरेशन पूर्ण झाल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व कामगारांच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (Ramban Tunnel Collapse News)
जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील महामार्गावर असलेला बांधकाम सुरु बोगदा गुरुवारी रात्री १०.१५ वाजता अचानक कोसळला यामध्ये 10 जण अडकले होते. यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा: 'चिंता वाटते' म्हणत चव्हाणांचा ‘काँग्रेस’ला घरचा आहेर
कशी घडली घटना ?
जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) राष्ट्रीय महामार्गावर चार लेनच्या बोगद्याचे काम सुरु होते. यावेळे बोगद्याचे ऑडिट करण्याचे काम एक टीम करत होती. त्यावेळी अचानक बोगद्याचा एक भाग कोसळला. यामध्ये काही मजूर अडकून बसले. यातील काही जणांना वाचवण्यात यश आले, मात्र, काही जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून, घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 4 वर पोहोचली आहे. अद्यापही मातीच्या ढिगाऱ्याखाली सहाजण अडकून पडल्याचे सांगितले जात असून, त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
Web Title: Ramban Tunnel Collapse Five Bodies Found So Far Five Labourers Still Missing
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..