Ramnath Kovind: मावळते राष्ट्रपती असतील सोनिया गांधींचे नवे शेजारी

जाणून घ्या राष्ट्रपती पदाच्या निवृत्तीनंतर कोणत्या सुविधा मिळतील?
Ramnath Kovind
Ramnath Kovindesakal

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २५ जुलै रोजी संपत आहे. 23 जुलै रोजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू संसद भवन येथील सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभ आयोजित करत आहेत. यादरम्यान राष्ट्रपती कोविंद यांना 'स्मृतीचिन्ह' आणि संसद सदस्यांच्या स्वाक्षरीचे 'स्वाक्षरी पुस्तक' देखील प्रदान केले करण्यात येईल. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदार या कार्यक्रमाचा भाग असतील.

कार्यकाळ संपण्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच 22 जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे संपूर्ण सामान नवीन बंगल्यात हलवण्यात येणार आहे. तथापि, कोविंद यांचे राष्ट्रपती भवनातून अधिकृत प्रस्थान 25 जुलै रोजी होईल, जेव्हा नवीन राष्ट्रपती शपथ घेतील.

Ramnath Kovind
जात पाहून खुश होऊ नका, कोविंद राष्ट्रपती झाले, पण..; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

राष्ट्रपती कोविंद यांना नवा बंगला कुठे आहे ते जाणून घेऊया? त्याची खासियत काय आहे? निवृत्तीनंतर कोविंद यांना किती पेन्शन मिळेल? कोणत्या सुविधा उपलब्ध होतील?

आधी जाणून घ्या राष्ट्रपती कोविंद यांचे नवीन घर कुठे असेल?

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर दिल्लीतील १२ जनपथ येथे बंगला देण्यात आला आहे. हा तोच बंगला आहे जिथे काही वर्षांपूर्वी रामविलास पासवान राहत होते. पासवान दोन दशकांहून अधिक काळ या बंगल्यात राहत होते. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी ते रिकामे केले. आता हा बंगला रामनाथ कोविंद यांना देण्यात आला आहे.

बंगला पूर्णपणे नव्याने डिझाइन करण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची कन्या स्वाती कोविंद यांनी बंगल्याच्या नूतनीकरणाच्या कामावर देखरेख केली. या बंगल्याशेजारी म्हणजेच १० जनपथवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निवासस्थान आहे.

प्रथम पशुपती कुमार, नंतर अश्विनी चौबे यांना बंगले करण्यात आले वाटप

रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांचे भाऊ पशुपती कुमार यांना 12 जनपथ बंगल्यात राहण्याची ऑफर देण्यात आली होती. पशुपती सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. पशुपतीने त्यास नकार दिला. त्यानंतर हा बंगला रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी कुमार चौबे यांना देण्यात आला. मात्र, तेव्हा घर रिकामे नव्हते. अशा स्थितीत अश्विनी कुमार यांना दुसरा बंगला देण्यात आला.

जाणून घ्या, निवृत्तीनंतर राष्ट्रपती कोविंद यांना कोणत्या सुविधा मिळतील?

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवृत्तीनंतर दरमहा दीड लाख रुपये पेन्शन मिळणार आहे. याशिवाय सचिवीय कर्मचारी आणि कार्यालयीन खर्चासाठी दरमहा 60 हजार रुपये दिले जातील. याशिवाय सरकारने दिलेल्या बंगल्याचे भाडेही नसेल.

Ramnath Kovind
दोन वेळा PM पद नाकारलेल्या व्यक्तीची होतेय चौकशी; CM बघेलांकडून टीकास्त्र

माजी राष्ट्रपती या नात्याने कोविंद यांना दोन लँडलाईन, मोबाईल फोन, ब्रॉडबँड आणि इंटरनेट कनेक्शनही दिले जाणार आहेत. याशिवाय वीज आणि पाण्याचे बिलही भरावे लागणार नाही. कोविंद यांना ड्रायव्हर आणि कारही देण्यात आली आहे.

या सुविधाही उपलब्ध असतील

1) आरोग्य सुविधा पूर्णपणे मोफत असतील.

2) रेल्वे आणि विमान प्रवास मोफत असेल. माजी राष्ट्रपतींसह अन्य एका कर्मचाऱ्यांलाही ही सुविधा मोफत दिली जाणार आहे.

3) इतर सेवेसाठी पाच कर्मचारी असतील. याशिवाय सर्व सुविधांसह मोफत वाहन दिले जाणार आहे.

4) दिल्ली पोलिसांकडून सुरक्षा देण्यात येणार आहे. सोबतच दोन सचिवही असतील.

Ramnath Kovind
सोनिया गांधींच्या चौकशीची धुरा ईडीच्या महिला अधिकाऱ्याकडे, जाणून घ्या डिटेल्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com