PM Swearing In: नाद करा पण...! निवडणूक हरूनही 'या' पठ्ठ्यानं पटकावलं नव्या सरकारमध्ये मंत्रिपद

Ravneet Singh Bittu:रवनीत बिट्टू यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी अमित शाह यांनी निवडणुकीदरम्यान बिट्टू माझा मित्र असल्याचे म्हटले होते.
Ravneet Singh Bittu|Swearing in Ceremony|Punjab Congress|BJP
Ravneet Singh Bittu|Swearing in Ceremony|Punjab Congress|BJPEsakal

आज देशात तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन होत आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात सामील होणारे मंत्रीही शपथ घेणार आहेत. पंजाबचे भाजप नेते रवनीत सिंग बिट्टू हेही मोदी मंत्रिमंडळात मंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

बिट्टू यापूर्वी तीन वेळा काँग्रेसचे खासदार राहिले आहेत आणि पंजाबचे दिवंगत मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू आहेत.

यावेळी पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग राजा वाडिंग यांनी लुधियाना लोकसभा मतदारसंघातून रवनीत बिट्टू यांचा पराभव केला. बिट्टू 2009 मध्ये आनंदपूर साहिब आणि 2014 आणि 2019 मध्ये लुधियानामधून काँग्रेसच्या तिकिटावर सातत्याने निवडणूक जिंकत आहेत. रवनीत बिट्टू यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी अमित शाह यांनी निवडणुकीदरम्यान बिट्टू माझा मित्र असल्याचे म्हटले होते.

Ravneet Singh Bittu|Swearing in Ceremony|Punjab Congress|BJP
NDA Government: नवे सरकार मारणार चौकार? पाच वर्षांत NDA घेऊ शकते 'हे' चार मोठे निर्णय

एलकेएममधील चहापानाच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर भाजप नेते रवनीत सिंह बिट्टू म्हणाले की, निवडणूक हरल्यानंतरही त्यांनी मला त्यांच्या मंत्रिमंडळात निवडले ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. यावेळी पंजाबला प्राधान्य देण्यात आले आहे. 2027 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जिंकण्यासाठी मी मैदान तयार करेन.

काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी पंजाबच्या जनतेने काँग्रेसला नाकारले होते. तुम्ही करत असलेले काम सर्वांना माहीत आहे. त्यामुळे लोकांकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे भाजप. यासोबतच मला संधी मिळाली तर मला पंजाबचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असेही ते म्हणाले.

Ravneet Singh Bittu|Swearing in Ceremony|Punjab Congress|BJP
VK Pandian: शपथविधी दिल्लीत भूकंप ओडिशात! नवीन पटनायक यांचे राईट हँडची राजकारणातून निवृत्ती

या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकट्याने पंजाबमध्ये १३ जागा लढवल्या. या निवडणुकीत त्यांना एकही जागा मिळाली नसली तरी पंजाबमध्ये भाजपची मतांची टक्केवारी नेहमीपेक्षा मोठी आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन आणि त्यांच्या मागण्यांबाबत पंजाबमध्ये तणावाचे नवे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.

रवनीत सिंह बिट्टू हे पंजाबचे ज्येष्ठ खासदार राहिले आहेत आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग कुटुंबातून आले आहेत, त्यामुळे त्यांची निवड केंद्रीय मंत्रिमंडळासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com