
अहमदाबाद विमान अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे. गुरुवारी अहमदाबादहून लंडनला उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच एअर इंडियाचे विमान कोसळले. विमानात २४२ लोक होते. मेघनीनगरच्या निवासी भागात हा अपघात झाला. येथे बीजे मेडिकल कॉलेज आहे. या कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर विमान कोसळले. या अपघातात काही जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. कसा तरी आपला जीव वाचवणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या आईने अपघाताचे भयानक दृश्य वर्णन केले आहे.