esakal | रिलायन्स करणार बिल गेट्सच्या कंपनीत 5 कोटी डॉलरची गुंतवणूक 
sakal

बोलून बातमी शोधा

anil ambani

ही गुंतवणूक येत्या 8 ते 10 वर्षांत केली जाणार आहे.

रिलायन्स करणार बिल गेट्सच्या कंपनीत 5 कोटी डॉलरची गुंतवणूक 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आता 5 कोटी डॉलर म्हणजे जवळपास 371 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. अमेरिकेच्या ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्स लिमिटेडमध्ये ही गुंतवणूक केली जाणार आहे. ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्सचे नेतृत्व मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स करत आहेत. याबाबतची माहिती रिलायन्सने दिली आहे. 

हेही वाचा - आत्मनिर्भर भारताची दमदार वाटचाल; भारताकडून पहिल्यांदाच 'ब्रह्मोस मिसाईल'ची निर्यात​
8 ते 10 वर्षांत होईल गुंतवणूक
यासंदर्भात रिलायन्सने सांगितलं की, या गुंतवणुकीबाबत दोन्हीही कंपन्यांमध्ये करार झाला आहे. ही गुंतवणूक येत्या 8 ते 10 वर्षांत केली जाणार आहे. ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्सचा उद्देश उर्जा आणि शेतीमधील क्रांतीकारी अशा टेक्नोलॉजीमध्ये गुंतवणूक करुन पर्यावरणीय संकटांवर उत्तर शोधण्याचा आहे. यासंदर्भातच रिलायन्सदेखील गुंतवणूक करणार आहे. 

हेही वाचा - नव्या संसदेचे भारतीय पद्धतीने सुशोभिकरण; अशी असणार आहे आपली नवी संसद

भारताच्या दृष्टीने महत्त्व
रिलायन्सने पुढे म्हटलंय की, या गुंतवणुकीचे भारताच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. इतकंच नव्हे, याचा चागंगला परतावा देखील मिळणार आहे. या देवघेवीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी आवश्यक आहे. या गुंतवणुकीत रिलायन्सच्या प्रमोटर अथवा ग्रुपच्या कंपनींचा फायदा समाविष्ट नाहीये. मुकेश अंबानी हे खूप काळापासून उर्जेच्या स्वच्छ स्त्रोतांचे समर्थन करत आहेत. म्हणूनच ही गुंतवणूक केली जात आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला शुक्रवारी आपल्या तिमाहीत 9,567 कोटी रुपयांचा फायदा मिळाला आहे. खरंतर हे मागच्या वर्षाच्या तिमाहीपेक्षा 15 टक्के कमी आहे.