esakal | reliance, Infosys ला कर्मचाऱ्यांची काळजी; कोरोना लसीकरणाचा उचलणार खर्च

बोलून बातमी शोधा

reliance}

रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरमन आणि संस्थापक नीता अंबानी यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवून लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सांगितलं आहे.

reliance, Infosys ला कर्मचाऱ्यांची काळजी; कोरोना लसीकरणाचा उचलणार खर्च
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरमन आणि संस्थापक नीता अंबानी यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवून लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सांगितलं आहे. या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या लसीकरणाचा खर्च कंपनी उचलणार आहे. कंपनीने म्हटलंय की, कर्मचाऱ्यांचे पती-पत्नी, आई-वडील आणि मुलांच्या लसीकरणाचा खर्च कंपनी उचलेल. कर्मचाऱ्यांना कंपनीने पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हणण्यात आलंय की, तुमच्या मदतीने आपण कोरोना महामारीवर मात करु शकतो. तोपर्यंत निष्काळजीपणा  दाखवू नका. सुरक्षा आणि स्वच्छतेसंबंधी सर्व खबरदारी घ्या. आणप सर्व एका सामूहिक लढाईच्या अंतिम टप्प्यात आहोत. आपण सर्व मिळून कोरोना विषाणूवर मात करु आणि आपण जिंकू. 

याआधी 2020 मध्ये रिलायन्सने फॅमिली डे दिवशी चेअरमन आणि मॅनेजिंक डायरेक्टर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आश्वासन दिले होते की, भारतात कोरोना लसीला मंजुरी दिल्यानंतर रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुबीयांना लस मोफतमध्ये दिली जाईल. कंपनीने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये शेवटी लिहिलं आहे की, 'कोरोना हारेल, भारत जिंकेल'

कोरोना लसीकरणात भारताचा रेकॉर्ड; एका दिवसात तब्बल इतक्या लोकांना लस

इंफोसिसकडूनही कर्मचाऱ्यांना मोफत लस

सॉफ्टवेअर कंपनी इंफोसिसनेही Infosys आपल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी प्रविण राव यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी कंपनीला साथ दिली. त्यामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी  सांगण्यात आलं आहे. अॅसेंचर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या लशीचा खर्च उचलणार असल्याचं सांगितलं आहे.

Corona: मॉल्स, रेस्तराँ आणि धार्मिक स्थळांसाठी केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स

दरम्यान, देशात दोन लशींच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. यात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीचा समावेश आहे.  लोकांना या दोन्ही लशींचा डोस देण्यात येत आहे. त्यांना या दोन लशींपैकी एक लस निवडण्याचा पर्याय देण्यात आलेला नाही. दोन दिवसांपूर्वी भारत बायोटेकने कोवॅक्सिन लस 85 टक्के प्रभावी असल्याचं म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मार्च रोजी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्यातील पहिली लस घेतली होती. त्यानंतर देशातील अनेक मान्यवरांनी कोरोनाची लस घेतली आहे.